भाजपाचा सवाल
मुंबई : पालिका आयुक्त सीताराम कुंटे गेल्या आठवड्यात दोन दिवसांत मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करू, अशी वल्गना केली होती. मग आता २५ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजवण्यासाठी वेळ का पाहिजे, असा सवाल भाजपाचे गटनेते दिलीप पटेल यांनी केला आहे.
मुंबईतील रस्त्यांवरील खड्डय़ांवरून राजकीय वातावरण तापले असताना उच्च न्यायालयाकडूनही खड्डय़ांची दखल घेतली गेल्याने पालिका आयुक्तांनी गेल्या आठवड्यात खड्डय़ांची दखल घेतली गेल्याने पालिका आयुक्तांनी गेल्या आठवड्यात पावसाची उघडीप मिळाल्यानंतर दोन दिवसांत खड्डे भरले जातील, असे सांगत रविवारची डेडलाइन दिली होती. मात्र खड्डे बुजवल्यानंतर निकृष्ट दर्जाच्या मालामुळे हे खड्डे पुन्हा उखडणार असल्याची माहिती असल्याने बहुधा प्रशासनाकडून आता २५ ऑगस्टची डेडलाइन दिली गेली असावी, असा टोला पटेल यांनी लगावला. एकीकडे मुंबईतील रस्त्यांवरील खड्डय़ांची संख्या कमी असल्याचे सांगणार्या प्रशासनाला पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांमधील कसे लागेबांधे असतात हे ठाऊक असल्यानेच बुजवलेले खड्डे पुन्हा झाल्यास ते पुन्हा बुजवण्यासाठी अवधी मिळावा यासाठीच प्रशासनाकडून ही नवीन डेडलाइन देण्यात आली असावी, असे दिलीप पटेल यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment