सर्विस रोडवर वाट पाहतोय मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सर्विस रोडवर वाट पाहतोय मृत्यू

Share This
मुंबई /मानखुर्द /रशिद इनामदार
( http://jpnnews.webs.com ( NEWS website )
दि :/८/२०१

Photo-0024.jpgPhoto-0027.jpg
यशवंतराव चव्हान महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारा वीरमाता जिजाबाई भोसले मार्ग सध्या चर्चेत आहे . कारण आहे या मार्गाला लागून असलेल्या सर्विस रोड वर उघडे असलेल्या मेन होल चं . या सर्विस रोड च्या बाबतीत बर्याचदा स्थानिकांना प्रश्न पडतो सर्विस रोड बनविण्यासाठी खर्च करण्याचं  प्रशासनाचं  नक्की प्रयोजन काय असाव ? कारण या सर्विस रोड चा नागरिक आणि काही समाजसेवक स्वतः च्या रोजीरोटीसाठी बेकायदा वापर करत आहेत . 

महाराष्ट्र नगर नाक ते पी एम जी पी वसाहतीपर्यंत हा रिक्षा आणि इतर वाहनाच्या पार्किंगसाठी बेकायदारित्या वापरला जातो . त्यावर कमाई चांगली मिळते . पोलिस याकडे दुर्लक्ष करतात कारण त्यांना व्यावसायिकाकडून चिरीमिरी मिळते . तिथून पुढचा भाग हा गाड्या दुरुस्ती साठी वापरला जातो . मोहिते पाटील च्या नाल्यावरील पुलाच काम आजतागायत झालेलंच नाही त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी वापरला गेला नाही . म्हाडा वसाहतीच्या बाजूला साठेनगर च्या दिशेला इथे एक मेन होल उघडे आहे . बऱ्याचदा वाहनचालक आणि पादचारी अपघात होण्यापासून थोडक्यात बचावतात . सुदैवाने कोणतीही दुर्घटना तिथे झालेलि नाही . मागील वर्षी अशाच उघड्या मेनहोल मध्ये पडून चीमुर्द्याचा जीव गेला होता . त्याची पुनरव्रुती होण्याची भीती तेथील रहिवाशांना सतावताना दिसत आहे . 

ह्या सर्विस रोड साठी इतका खर्च करण्याचा सरकारचा हेतू काय ? जर हेतू चांगला आहे तर काम पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला का नाही करत ? बेकायदा वापर करण्यावर सरकार कारवाई केंव्हा करणार ? उघडे मेनहोल जे मृत्यूस कारणीभूत ठरतील त्यांच्याकडे दुर्लक्ष का केले जाते आहे . असे सवाल नागरिक विचारताना दिसत आहेत 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages