पेवर ब्लॉक ची किमया आणि कॉफी कलरची नक्षी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पेवर ब्लॉक ची किमया आणि कॉफी कलरची नक्षी

Share This
मुंबई / मानखुर्द / रशिद इनामदार
http://jpnnews.webs.com ( NEWS website )
दि : ३१/०७/२०१३Photo-0022.jpgPhoto-0020.jpg
मानखुर्द येथील पी एम जी पी वसाहतीतील पेवर ब्लॉक मुळे हल्ली नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे . वसाहतीतील मुख्य रस्त्यापासून ते यशवंतराव चव्हाण मार्गाला जोडणारा पेवर ब्लॉक  चा रस्ता यासाठी कारणीभूत आहे . हा रस्ता मुळातच अरुंद आहे . त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या १ ते ४ क्रमांकाच्या इमारती पाडून पुन्हा शिर्के कं . कडून नव्याने बांधकाम सुरु आहे . त्यामुळे या रस्त्यावर बांधकामाचे अवजड साहित्य घेऊन येणारे ट्रक ची ये जा सुरु असते . पेवर ब्लॉक चा रस्ता त्यामुळे काही ठिकाणी खचला आहे तर काही ठिकाणी त्याला उंचवटे तयार झाले आहेत . पावसाची एखादी जोराची सर आली तरी या रस्त्यावर जलाशय तयार होतो . बांधकाम आणि त्यातून होणारी वाहनांची ये जा यामुळे या रस्त्यावर बऱ्याचदा खुप चिखल असतो . पादचारी रस्त्याच्या कडेने असलेल्या पदपथावरून मार्ग क्रमन करत असतात . अशातच एखादं वाहन वेगात गेल तर उडणाऱ्या  चिखलामुळे कॉफी कलर ची नक्षी कपड्यावर उटते . हा रस्ता अरुंद असल्यामुळे रहदारी साठी योग्य नाही तरीही वेळ आणि इंधन वाचविण्यासाठी वीरमाता जिजाबाई भोसले मार्ग , महाराष्ट्र नगर नाका ते यशवंतराव चव्हान मार्ग हा वळसा टाळतात . त्यामुळे एक वाहन जाण्याची क्षमता असलेल्या रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने आल्यावर कोंडी निर्माण होते . नागरिकांना त्यामुळे पायी चलने हि अवघड होऊन बसतं. याची दखल महापालिका , स्थानिक नगरसेवक घेतील का ? असा संतप्त सवाल पी एम जी पी वसाहत , म्हाडा वसाहत , मोहिते पाटील नगर , चीक्कुवाडी चे रहिवासी विचारताना दिसत आहेत . 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages