मुंबई (रेप) सिटी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई (रेप) सिटी

Share This
दिल्ली मध्ये एका युवतीवर सामुहिक बलात्कार होऊन त्यामध्ये त्या युवतीचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई शहर दिल्ली पेक्षा किती सुरक्षित आहे, मुंबई मध्ये दिल्ली सारखे बलात्काराचे प्रकार होत नाहीत यावर चर्चा होत होती. परंतु गेल्या काही वर्षाचा मुंबई मध्ये बलात्काराची आकडेवारी पाहिल्यास मुंबई मध्ये दर दिवशी एका महिलेवर बलात्कार होत आहे.

गेल्याच आठवड्यात अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी मुंबई महालक्ष्मी परिसरातील शक्ती मिल परिसरात छायाचित्र काढण्यासाठी गेलेल्या महिला छायाचित्रकारावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. महिला छायाचित्रकारावर बलात्कार झाल्याचे वृत्त वाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या निदर्शनास आल्यावर पत्रकार, छायाचित्रकार यांच्यात संताप निर्माण झाला. 

पत्रकार, छायाचित्रकार यांच्यात संताप निर्माण होऊन आंदोलन करतील या मुळे सरकारला याची भारी किंमत मोजावी लागेल या भीतीने सरकार व गृह विभागाने त्वरित कारवाही करत सामुहिक बलात्कार करणाऱ्या तिघा आरोपींना आतापर्यत अटक केली आहे. हा खटला जलद गती न्यायालयात चालवला जाणार असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी जाहीर केले आहे. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या युवतीचा सर्व रुग्णालयातील खर्च सरकार जाहीर केले आहे.

मिडिया मधील महिला छायाचित्रकारावर झालेला बलात्कार यामुळे सरकारने  मिडिया मधील महिला छायाचित्रकारावर झालेला बलात्कार यामुळे सरकारने बलात्कारी लोकांवर त्वरित कारवाही करण्याचे जाहीर केले तरी सन २००२ ला मुंबई मध्ये १२८, २००३ मध्ये १३३, २००४ मध्ये १८६, २००५  मध्ये १९८, २००६ मध्ये १६३, २००७ मध्ये १७२, २००८ मध्ये २१५, २००९ मध्ये १७८, २०१० मध्ये १९२, २०११ मध्ये २१९, २०१२ मध्ये २३१ तर २०१३ च्या जानेवरी ते एप्रिल या पहिल्या चार महीन्यात ११६ बलात्काराचे प्रकार झालेले  आहेत.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages