कंडोम व्हेंडिंग मशीन घोटाळा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कंडोम व्हेंडिंग मशीन घोटाळा

Share This
स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा यानंतर कॅगने कंडोम व्हेंडिंग मशीनच्या घोटाळ्याप्रकरणी केंद्र सरकारला जाब विचारला आहे. सरकारने रेल्वे स्टेशन, बस डेपो, रेड लाइट एरिया आदी ठिकाणी तब्बल २२ हजार कंडोम व्हेंडिंग मशीन बसवण्याचा निर्णय घेतला. या योजनवर २१ कोटी रुपये खर्च झाले. पण या योजनेच्या अंमलबाजवणीतही घोटाळा झाल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे.

सरकारी कागदपत्रात नोंद असली तरी तब्बल दहा हजार ठिकाणाहून कंडोम व्हेंडिंग मशीन गायब आहेत. जी मशीन अस्तित्वात आहेत, त्यातील १,१०० मशीन बिघडली असून अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे ही योजना अयशस्वी झाली आहे, असा आरोप कॅगने केला. नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनने (नाको) योजना राबवताना प्रचंड हलगर्जीपणा केला, असेही कॅगने नमूद केले आहे.

योजनेचा पहिला टप्पा अपेक्षित यश मिळवू शकला नाही. अशा वेळी योजनेतील दोष शोधून ते दूर करण्याऐवजी योजनेचा पुढचा टप्पा राबवण्याची घाई करण्यात आली. या अजब निर्णयामुळे कंडोम व्हेंडिंग मशीनची पूर्ण योजनाच अयशस्वी झाल्याचे कॅगने सांगितले.

एचएलएल लाइफकेअर कंपनीकडून कंडोम व्हेंडिंग मशीन घेण्यात आली. कोट्यवधींच्या या प्रकल्पात मशीनचा विमा काढण्यात आला नसल्यामुळे बिघडलेल्या अथवा गायब झालेल्या मशीनची भरपाई होऊ शकलेली नाही. मशीनच्या देखभालीची तर कोणतीच तजवीज करण्यात आली नाही. हा गंभीर स्वरुपाचा हलगर्जीपणा असल्याचे नमूद करत कॅगने योजनेचा हेतू कोट्यवधी खर्चूनही साध्य झाला नसल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages