जलबोगद्याला तडे : पालिकेत तीव्र पडसाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 November 2013

जलबोगद्याला तडे : पालिकेत तीव्र पडसाद

मुंबई : पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मालाड येथे जलबोगद्याला तडे जाऊन झालेला पाण्याचा अपव्यय तसेच जलबोगद्याच्या दुरुस्तीसाठी येणारा कोट्यवधींचा खर्च याचे तीव्र पडसाद मंगळवारी सभागृहात उमटले. या प्रकरणाला जबाबदार असणार्‍या संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी या वेळी लावून धरली.

याकडे भाजपाचे दिलीप पटेल यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. मालाड येथील एका सोसायटीत बोअरवेल खोदताना तेथील जलबोगद्याला तडे गेले त्यामुळे तेथील पाणीपुरवठय़ावर याचा विपरीत परिणाम झाला. अनधिकृत बोअरवेलमुळे जमिनीखालून जाणार्‍या जलबोगद्यांना धोका निर्माण झाला आहे. जलबोगदे कुठून कुठे गेले आहेत याचे मॅपिंग पालिकेने केले का? बोअरवेलऐवजी सोसायट्यांना रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करा, बोअरवेल्ससाठी परवानगी देण्यावर बंदी आणा, सरसकट बोअरवेल न करण्यासाठी धोरण आखा आदी मागण्याही पटेल यांनी या वेळी केल्या. दहिसरमध्ये नवीन बोअरवेल खोदण्याचे सत्र सुरूच असून याबाबत पालिकेकडे तक्रार करूनही याची दखल घेतली जात नाही.बोअरवेलसाठी मनपाने काय प्लॅन आखला, असा सवाल काँग्रेसच्या शीतल म्हात्रे यांनी याला सर्मथन दर्शवताना केला.या प्रकारामुळे गोरेगाव ते दहिसर येथील पाणीपुरवठय़ावर परिणाम झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत.

या प्रकरणास जबाबदार असणार्‍या संबंधितांवर कारवाई करावी. या जलबोगद्याच्या दुरुस्तीसाठी वेळ लागणार आहे. त्यासाठी तेथील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, मात्र तेथील रहिवाशांसाठी काय व्यवस्था केली, असा प्रश्न काँग्रेसच्या डॉ. अजंता यादव यांनी उपस्थित केला.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS