मच्छीमारांच्या प्रश्नांवर १५ दिवसांत निर्णय - आयुक्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 November 2013

मच्छीमारांच्या प्रश्नांवर १५ दिवसांत निर्णय - आयुक्त



मुंबई : मच्छीमारांच्या प्रलंबित मागण्यांवर येत्या १५ दिवसांत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.मच्छी मार्केटचे सर्वेक्षण करून मगच परवान्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी मच्छीमार संघटनेचे नेते सागर किल्लेकर, ट्रिजाताई किल्लेकर, सतीश महाजन यांच्या शिष्टमंडळाला मंगळवारी पालिका मुख्यालयात दिले. परप्रांतीयांच्या दादागिरीमुळे मूळ मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुढील पिढीला जगवायचे कसे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. परवाने नसल्याने व्यावसायिकांवर कारवाई होत आहे, मात्र परप्रांतीय दादागिरी करत व्यवसाय करत आहेत. खाजगी मार्केटमधील महिलांना गुमास्ता प्रमाणे परवाने द्यावे, ४१0चे कलम त्वरित लागू करावे, मच्छी मार्केटची दुरुस्ती करावी, रस्त्यावर बसून मच्छी विकणार्‍या महिलांना छप्पर आणि पाण्याची सोय करावी, आदी मागण्या घेऊन मंगळवारी हजारो महिला मोठय़ा प्रमाणात आझाद मैदानात उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS