महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 January 2014

महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही

मुंबई : उपनगरी रेल्वेत महिलांचा प्रवास सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आगामी काळात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळ अर्थात एमआरव्हीसीतर्फे येत्या काळात नव्या ७२ गाड्या सेवेत येणार आहेत. या लोकलमध्ये महिलांच्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पश्‍चिम रेल्वेवरील लोकलमध्ये प्रायोगिक तत्त्वावरील सीसीटीव्हीचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. त्यामुळे आणखी काही गाड्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा खर्च सुमारे २५ ते ३५ कोटी रुपयांपर्यंत येण्याची शक्यता आहे. प्रत्येक नव्या गाडीची किंमत सुमारे ४२ कोटी रुपये असून दोन नमुना गाड्या तयार आहे. त्यास रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिल्यानंतर मेपासून आणखी तीन ते चार गाड्यांचे उत्पादन केले जाणार आहे. या योजनेस परवानगी मिळाल्यास महिलांच्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवूनच त्या सेवेत आणण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS