आता ऑनलाइन मतदार नोंदणी होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 January 2014

आता ऑनलाइन मतदार नोंदणी होणार

2/1/2014  http://jpnnews.webs.com
नवी दिल्ली : देशातील निवडणूक व्यवस्था अधिक व्यापक करत अधिकाधिक मतदारांची नोंदणी करण्याच्या उद्देशाने केंद्रीय निवडणूक आयोगाने जगातील सर्वात मोठय़ा सर्च इंजिन असलेल्या गुगल कंपनीशी हातमिळवणी केली आहे. त्यानुसार मतदारांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी 'गुगल' निवडणूक आयोगाची मदत करणार आहे. 


पुढील सहा महिन्यांत गुगलकडून आयोगाला काही या संदर्भातील डोंगल पुरवण्यात येतील. यामध्ये गुगलच्या सर्च इंजिनचाही समावेश असून याद्वारे मतदार त्याची ऑनलाइन नोंदणी करून मतदार यादीतील आपल्या नावाची पडताळणी करू शकेल. तसेच निवडणुकीवेळी आपले मतदान केंद्र नेमके कोणते आहे आणि तेथे जाण्याचा मार्गही गुगल मॅपवरून मतदाराला शोधता येईल. गुगल आणि आयोगामध्ये सहकार्य करारान्वये चालू महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होईल. विशेष म्हणजे गुगल यासाठी आयोगाकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही. यासाठी गुगलला ५0 हजार डॉलर म्हणजे जवळपास ३0 लाख रुपये खर्च येणार असून, हा खर्च कंपनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व बजेटमधून करणार आहे. सद्यस्थितीला गुगल आपली ही सेवा जगभरातील जवळपास १00 देशांना पुरवत आहे. ऑनलाइन मतदार नोंदणीची ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाने हायटेक आणि व्यावसायिक तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. चालू वर्षात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करताना गुगलचे जागतिक नेटवर्क आणि सर्व्हरचा वापर करता येईल का, असा पर्यायही आयोग तपासून बघत आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS