बस भाडेवाढ रद्द करा - राहुल शेवाळे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 January 2014

बस भाडेवाढ रद्द करा - राहुल शेवाळे

8/1/2014 http://jpnnews.webs.com 
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतर्फे बेस्ट उपक्रमाला सुमारे ३७५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याने बेस्ट प्रशासनाने प्रस्तावित बस भाडेवाढ रद्द करावी, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मंगळवारी सभागृहात बेस्टच्या अर्थसंकल्पावरील भाषणाच्या वेळी केली.

बेस्ट उपक्रमाचा सन २0१४-१५च्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवारी बेस्ट प्रशासनातर्फे सभागृहात सादर करण्यात आला. या वेळी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी बेस्टच्या अर्थसंकल्पावरील भाषणाच्या वेळी बस भाडेवाढ कमी करण्याची मागणी केली. मुंबई मनपाने बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी १ हजार ६00 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेतर्फे क्रू ड तेलावर आकारण्यात येणार्‍या जकातीचा दर ३ टक्क्यांवरून ३.२५ टक्के इतका करण्यात आला. त्याअनुषंगाने मिळणारे सुमारे २२५ कोटी रुपयांचे वाढीव उत्पन्न बेस्ट उपक्रमाला अर्थसहाय्य म्हणून देण्यात यावे, परिवहन निधी या नवीन निर्माण केलेल्या शीर्षकाखाली सन २0१४-१५ या वर्षाकरिता १00 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी आणि त्याचे सहाय्य बेस्ट उपक्रमाला करण्यात यावे, तसेच सुधारित मुंबई मनपा अधिनियमानुसार अर्थसंकल्पात ५0 कोटी रुपयांची तरतूद करून ती बेस्ट उपक्रमाला उपलब्ध करून द्यावी.

बस भाडेवाढीपोटी बेस्टला १५0 कोटी रुपयांचा महसूल मिळणार असला तरी मनपातर्फे बेस्टला १५0 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य तत्काळ उपलब्ध होणार असल्याने ही बस भाडेवाढ रद्द करावी, अशी मागणी या वेळी शेवाळे यांनी केली. बस भाडेवाढ रद्द करण्याबाबत बेस्टचे महाव्यवस्थापक गुप्ता यांनीही सकारात्मक भूमिका घेतल्याचे शेवाळे यांनी या वेळी स्पष्ट केल्याने बस भाडेवाढ रद्द होऊन मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने भाडेवाढ रद्द करण्याची मागणी केल्याची चर्चा पालिका वतरुळात सुरू होती. बेस्टच्या अर्थसंकल्पावर ९ आणि १३ जानेवारी रोजी सभागृहात चर्चा होणार असून त्यानंतर या बेस्टच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच या वेळी बेस्ट भाडेवाढ रद्द करण्याची घोषणाही होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS