मेट्रोच्या मार्गावरील रस्ते दुरुस्त करावे - महापौर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मेट्रोच्या मार्गावरील रस्ते दुरुस्त करावे - महापौर

Share This
मुंबई : येत्या काही महिन्यांत वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावरील पहिली मेट्रो रेल्वे सुरू होणार आहे. मेट्रोमुळे वर्सोवा-घाटकोपर हे अंतर कमी वेळात पार करता येऊ शकेल. मात्र, या मार्गाखालील रस्त्यावरची अवस्था दयनीय असून ठिकठिकाणी अनेक मोठे खड्डे आणि वाहतुकीला अडथळे आहेत. त्यामुळे येथील वाहतूक व्यवस्थाच पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे एमएमआरडीए आणि मेट्रो वन इन कंपनीने या मार्गातील रस्ते आणि खड्डे दुरुस्त करावे, असे आवाहन महापौर सुनील प्रभू यांनी केले आहे.
वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो रेल्वे ही वर्सोवा ते अंधेरी (प.)येथील जयप्रकाश रोड त्यानंतर अंधेरी पूर्वेकडील अंधेरी-घाटकोपर रोड या मार्गावरून उंचावरून धावणार आहे. आधीच गेली सहा वर्षे येथील नागरिकांनी मेट्रोमुळे खूप त्रास सहन केला आहे. वर्सोवा ते अंधेरी (प.) या मार्गावरून आंबोलीमार्गे जातांना वाहनांना सुमारे ४५ ते ५0 मिनिटे लागतात, तर अंधेरी(पूर्व) आगरकर चौक ते घाटकोपर स्थानक (प.) या मार्गावरून वाहनांना किमान एक तास लागतो. रोज या मार्गावरून सुमारे दोन ते तीन लाख वाहने ये-जा करतात, अशी माहिती महापौरांनी दिली. 

मेट्रोच्या मार्गावरील ११ स्थानकांवर जाण्याकरिता उभारलेले पादचारी पूल हे प्रामुख्याने पादचारी मार्गाच्या पदपथावर कमी जागेत आहेत. आधीच या मार्गावर होणारी कमालीची वाहतूक कोंडी, मेट्रो रेल्वे सुरू झाल्यानंतर या मार्गावरील मेट्रोच्या स्थानकावर जाणार्‍या-येणार्‍या प्रवाशांची गर्दी, त्यांना घेऊन येणार्‍या-जाणार्‍या वाहनांची गर्दी यामुळे वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावरील वाहतूक व्यवस्थाच पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता महपौरांनी व्यक्त केली. मेट्रो वन इन कंपनीने या मार्गावर मेट्रो सुरू होण्यापूर्वी येथील जमिनीवरून जा-ये करत गर्दीतून मार्गक्रमण करणार्‍या अंधेरी-घाटकोपर या मेट्रोच्या मार्गावरून लाखो मुंबईकर आणि वाहन चालकांचे जीवन सुखकर करावे आणि येथील वाहतूक व्यवस्था कशी कोलमडणार नाही याकडे जातीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages