मुंबई : उपनगरीय रेल्वेवर वाढलेल्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने ११ प्रमुख रेल्वे स्थानकांसाठी तयार केलेल्या प्रकल्पातील सर्व टेंडर प्रक्रिया जागतिक बँकेच्या हस्तक्षेपामुळे तत्काळ थांबवण्यात आली आहे. या टेंडर प्रक्रियेतील काही तांत्रिक मुद्दय़ांवर आक्षेप घेत सर्व टेंडर एकत्रित काढण्याची सूचना जागतिक बँकेने केली होती. त्यानुसार एमआरव्हीसीने ती सूचना अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
उपनगरीय रेल्वेने प्रवास करत असताना रेल्वे ट्रॅक ओलांडताना अनेक प्रवासी मृत्युमुखी पडतात किंवा गंभीर जखमी होतात. त्यामुळे अशा पद्धतीचे अपघात रोखण्यासाठी जागतिक बँकेच्या निर्देशानुसार एमआरव्हीसीने पहिल्या टप्प्यात उपनगरीय रेल्वे मार्गावरील ११ स्टेशन्सची निवड केली आहे. या प्रकल्पाची सुरुवात रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खडगे यांनी काही महिन्यांपूर्वी केली; परंतु एमआरव्हीसीला ही प्रक्रिया पुन्हा नव्याने हाती घ्यावी लागणार आहे. एमआरव्हीसीने सप्टेंबर १३ पर्यंत पाच विविध प्रकारचे टेंडर्स वेगवेगळय़ा वेळेस काढले आहेत. या ११0 कोटी रुपयांच्या प्रकल्पात सरकते जीने, पादचारी पूल, लिप्ट आदी सुविधा पुरवण्यात येणार आहेत. या प्रकल्पातील सर्व टेंडर एकत्रित काढण्याच्या सूचनेमुळे प्रस्तावित कामांच्या वेळांमध्ये कोणताही फरक पडणार नव्हता, तर फक्त त्यातील टेंडर्स एकत्रित क ाढून त्यास मिळणारी मंजुरी हीच बाब शिल्लक राहणार आहे.
कांजुरमार्ग आणि ठाण्यासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये टेंडर काढण्यात आले आहे. त्यामुळे या स्थानकांवरील कामांसाठी येणारा संभाव्य खर्चाचा अंदाज त्या संबंधित कंपनीला किं वा कंत्राटदारांना तत्काळ लक्षात येऊ शकतो, असा आक्षेप जागतिक बँकेच्या अधिकार्यांनी घेतला आहे. त्यामुळे एमआरव्हीसीने तत्काळ ही प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, उर्वरित सर्व कामांसाठी एकत्रित टेंडर्स काढण्यात येणार असल्याची माहिती एमआरव्हीसीच्या एका वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.

मरेवरील स्थानके - दादर, कुर्ला, कांजुरमार्ग, ठाणे, क ल्याण आणि ठाकुर्ली.
परेवरील स्थानके - दादर, कांदिवली, बोरिवली, भाईंदर, वसई आणि नालासोपारा.