मुंबई : अत्यंत रहदारी असलेला पूर्व द्रुतगती महामार्ग आणि अमर महल जंक्शनवरील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर)बरोबरच अमर महल जंक्शन उड्डाणपूल चालू आठवड्यात खुला होणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या या पुलामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडचे काम पूर्ण झाले असून हा रोड १६ एप्रिल रोजी वाहतूकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे तर अमर महल जंक्शन उड्डाणपुलाचे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता आणि अमर महल जंक्शनवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्राधिकरणाने हे दोन्ही प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमर महल जंक्शन येथे पूर्व द्रुतगती महामार्गासह पाच रस्ते एकत्र येतात. यामुळे या जंक्शनवर दररोज वाहतूक कोंडी होते. सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता आणि अमर महल जंक्शन उड्डाणपुलामुळे अमर महल जंक्शन, सायन, कलानगर जंक्शन आणि कुर्ला परिसरातील तसेच पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी मोकळी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे सांताक्रुझ ते चेंबूर अंतर १५ ते २0 मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. सध्या गर्दीच्या वेळी मुंबईकरांना हेच अंतर कापण्यासाठी तास ते दीड तास लागतो.