भारिपच्या कार्यकर्त्यांना मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भारिपच्या कार्यकर्त्यांना मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण

Share This
मुंबई - मनसेचे आमदार राम कदम यांच्या घाटकोपर-पश्‍चिम येथील घराबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी भारिप बहुजन महासंघाच्या बौद्ध धर्मीय कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीत भारिपचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. त्यांना विक्रोळी येथील महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत पोलिसांनी मात्र अदखलपात्र गुन्हा नोंदवल्याने बौद्ध धर्मीयांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. 
मनसेचे घाटकोपर पश्चिम येथील आमदार राम कदम यांच्या घरात रविवारी (२० एप्रिल) गौतम बुद्धांच्या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्या अस्थी बुद्धांच्या नसल्याचा दावा करीत भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते कदम यांच्या घराबाहेर जमले. यावरून मनसेचे कार्यकर्ते आणि महासंघाच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची होऊन भारिपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली.यात महासंघाचे रूपेश लांडगे, रवींद्र मोरे व रोहित तांबे जखमी झाले. हे कार्यकर्ते पार्कसाईट पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता, पोलिसांनीच त्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात दिले, असा आरोप भारिपने केला. भारिपच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली असली तरी असा कोणताही प्रकार घडलेला नाही, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सकपाळ यांनी सांगितले आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages