पालिकेच्या कुंभकर्णाना जाग आली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या कुंभकर्णाना जाग आली

Share This
मुंबई- नगरसेवक हे महापालिकेचे विश्वस्त असले, तरी त्यांना प्रशासनाच्या लेखी मात्र कोणतेच स्थान नाही. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची गंभीरतेने दखल घेतली जात नाही. त्याचे उदाहरण म्हणजे २००४मध्ये कुंभकोणी येथील शाळेत झालेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर तत्कालीन नगरसेविका वनिता इन्सुलकर आणि रिना सुर्वे यांनी विचारलेल्या प्रश्नांची चक्क दहा वर्षानी उत्तरे दिली गेली. महापालिकेच्या कुंभकर्णाना जाग आली असून, शाळांमधील आग प्रतिबंधक यंत्रणांबाबत तब्बल दहा वर्षानी नगरसेवकांना माहिती देण्यात आली. परंतु ही उत्तरे ऐकण्यासाठी या दोन्ही नगरसेविका सभागृहात नाहीत. ज्या दुर्घटनेबाबत भीती व्यक्त केली गेली होती, ती घटनाही आता सर्वाच्या विस्मृतीत गेली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages