मुंबई : बॉलीवूडचे स्टार अमिताभ बच्चन यांना लोकसभा निवडणुकीच्या काळात पालिकेच्या प्रभाग कार्यालयात चित्रीकरणास परवानगी देणारा प्रभाग अधिकारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. प्रभाग अधिकारी देवेंद्र जैन यांची बृहन्मुंबई महापालिकेद्वारे प्रशासकीय चौकशी केली जाणार असल्याचे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी निवडणूक आयोगाला कळवले आहे.
गेल्या आठवड्यात अमिताभ बच्चन आणि सारिका यांची प्रमुख भूमिका असलेल्या टीव्ही मालिकेच्या चित्रीकरणासाठी मालाड येथील पालिकेचे कार्यालय खुले करून देण्यात आले होते. आचारसंहितेच्या काळात पालिका कार्यालयात चित्रीकरणाला मुभा दिल्याबद्दल निवडणूक आयोगाने पालिका आयुक्तांकडे अहवाल मागवला होता. यादरम्यान प्रभाग अधिकारी जैन यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावून त्यांच्याकडून २४ तासांत उत्तर मागवण्यात आले होते. या प्रकरणी पालिका उपायुक्त व्ही. बलमवार यांनी चौकशी सुरू केली आहे. जैन यांनी वरिष्ठांकडून परवानगी घेतल्याशिवाय 'कर्मशिअल अँक्टिव्हीटी'साठी प्रभाग कार्यालय मोकळे करून दिल्याबद्दल त्यांची प्रशासकीय चौकशी केली जाणार आहे.