मुंबई : गोवंडी शिवाजीनगर येथे शाळांच्या इमारतींवर बेकायदा शाळा आणि काही ठिकाणी बेकायदा शाळांच्या इमारती उभारण्यात येत आहेत, अशी धक्कादायक बाब समाजवादी पक्षाच्या नगरसेविका नुरजहाँ शेख यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणली.
गोवंडी येथे अलीकडेच एका घराचे अनधिकृत बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्याचा संदर्भ देऊन त्या म्हणाल्या, शिवाजीनगरमध्ये ठिकठिकाणी बेकायदा शाळा उभारण्यात आल्या असून, काही शाळांच्या इमारतींवर शाळांचेच बेकायदेशीर बांधकाम करण्यात येत आहे. त्याला परवानगी कुठून मिळते, असा सवाल त्यांनी केला. येथे एखादी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण आहे, असेही त्या म्हणाल्या. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
अपक्ष नगरसेविका लीना शुक्ला यांनी शेख यांच्या हरकतीच्या मुद्दय़ाला पाठिंबा देताना, असल्फा व्हिलेज काजूपाडा येथे अंजुमन इस्लाम या एकमजली शाळेवर तीन मजले चढवण्यात आले आहेत. हे तीन मजले उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे पण ती बेकायदेशीर आहे. व या शाळेच्या उद््घाटनाप्रसंगी तेथे पालकमंत्रीही उपस्थित होते, असे सांगितले. हे बांधकाम कोसळून दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी केला. या हरकतींच्या मुद्दय़ांवर निर्णय देताना, समितीचे अध्यक्ष विनोद शेलार यांनी गोवंडी येथील बेकायदा शाळांची पाहणी करून याबाबतचा अहवाल पुढील समिती बैठकीत देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.