तीन दिवस ड्राय डे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तीन दिवस ड्राय डे

Share This
निवडणूक प्रक्रिया शांततेत व नि:पक्षपातीपणे पार पाडावी, या उद्देशाने जिल्ह्यातील मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र देशी दारू नियमावली १९७३ च्या नियम २६ (१) सी (२), मुंबई विदेशी मद्य नियमावली १९६९ च्या नियम अ (२) सी (१) व (२) तसेच महाराष्ट्र ताडी आणि ताडी छेदणे नियमावली १९६८ चा नियम ५ अ (१) व (२) मधील तरतुदीनुसार अनुक्रमे एफएएल २, एफएल ३, सीएल २, सीएल ३, एफएलबीआर २ मधील कलम १४२ (१) अन्वये शांतता, सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून मद्य व तत्सम पदार्थ विक्री करणार्‍या अनुज्ञप्त्या बंद करण्याचे जिल्हाधिकारी यांना आहेत. त्यानुसार २२, २३ व २४ एप्रिल तसेच १६ मे मतमोजणीच्या दिवशी सर्व प्रकारच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई दारुबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत कलम ५४ व ५६ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages