डॉकयार्ड दुर्घटना सहा महिन्यांनंतरही इमारत सुरक्षा समिती नाही - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉकयार्ड दुर्घटना सहा महिन्यांनंतरही इमारत सुरक्षा समिती नाही

Share This
मुंबई - डॉकयार्ड रोड येथील बाबू गेनू मंडई इमारत कोसळल्यानंतर मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी आणि धोकादायक इमारतींबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी पालिकेने ‘इमारत सुरक्षा समिती’ स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र सहा महिने उलटून गेले तरी समिती अजूनही स्थापन झाली नसून प्रशासनाची घोषणा हवेत विरली आहे.
डॉकयार्ड दुर्घटनेनंतर २८ सप्टेंबर २०१३ रोजी पालिका महासभेत अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी कमिशनवर ऑफ बिल्डिंग सेफ्टिंगच्या धर्तीवर इमारती सुरक्षा समिती स्थापन करण्याची घोषणा पालिका महासभेत केली होती. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीत आयआयटी, व्हीजेटीआय आणि स्ट्रक्चरल ऑडिट सल्लागारांचा समावेश करण्यात येणार होता. मात्र डॉकयार्ड दुर्घटेनला आणि अतिरिक्त आयुक्तांच्या घोषणेला सहा महिने उलटले तरी अद्याप समितीची स्थापना झालेली नाही.
धोकादायक इमारती
पालिका इमारत : १७५ खासगी इमारत : ७२८, एकूण : ९०३

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages