मुंबई - गुजरातमधील इतिहासाच्या पुस्तकातील चुकांबाबत नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केली. छत्रपतींचा इतिहास चुकीच्या पद्धतीने लिहिला जातो, असे मोदींनी रायगड येथील भाषणात सांगितले होते. त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली होती; मात्र याच मोदींच्या गुजरात सरकारकडून महाराजांचा चुकीचा इतिहास पसरविला जात आहे. तेथील इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा जन्म 1603 साली शिवनेरी राजवाड्यात झाला. त्यांना धार्मिक शिक्षण देणारे दादोजी कोंडदेव त्यांचे आजोबा होते, असे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
शिवाजी महाराजांचा जन्म 1930 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. एक वेळ ही चूक क्षम्य असली तरी ज्यांचा महाराजाच्या कुटुंबाशी दुरान्वयेही नातेसंबंध नव्हता, त्या दादोजी कोंडदेवांना महाराजांचे आजोबा म्हणणे म्हणजे द्रोह आहे. गुजरातच्या नेतृत्वाचाच इतिहास कच्चा असल्यावर इतरांकडून काय अपेक्षा करायची, असा टोला त्यांनी लगावला.
मोदी आतापर्यंत केवळ सभांमधून खोटे बोलत होते; पण आता गुजरातमधील शाळांमधूनही ते खोटा इतिहास शिकवत आहेत, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राच्या मानबिंदूंचा अपमान आम्ही सहन करणार नाही. या चुकीबद्दल त्यांनी माफी मागावी; अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, कॉंग्रेसचे खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनीही या प्रकरणावरून मोदींवर जोरदार हल्ला चढविला. ज्याला इतिहास माहीत नाही, ती व्यक्ती देशाचा इतिहास कसा घडविणार, असा सवाल त्यांनी गांधी भवनात पत्रकार परिषदेत केला.