मुंबई - डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटनेतील चार दोषी अभियंत्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. महापालिकेने निलंबित केलेल्या या अभियंत्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनने केली आहे.
डॉकयार्ड रोड दुर्घटनेत 61 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेप्रकरणी सहायक अभियंता राहुल जाधव, कार्यकारी अभियंता एम. एन. पटेल, सहायक अभियंता एस. एम. येले आणि एम. के. रेडेकर यांना अटक झाली होती. त्यांची रवानगी ऑर्थर रोड तुरुंगात झाली होती. महापालिकेने त्यांना सप्टेंबर 2013 मध्ये निलंबित केले होते. उच्च आणि सत्र न्यायालयातून त्यांना जामीन मिळाला असल्याने त्यांची तुरुंगातून सुटका झाल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
तांत्रिक अहवालात ठपका नाही
महापालिकेने सादर केलेल्या तांत्रिक अहवालात या चौघांवर कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे पालिकेने त्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, अशी मागणी इंजिनिअर्स असोसिएशनचे सरचिटणीस साईनाथ राजाध्यक्ष यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.