दिवा-सावंतवाडी पॅसेजर गाडी घसरली; 20 ठार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दिवा-सावंतवाडी पॅसेजर गाडी घसरली; 20 ठार

Share This
मुंबई - दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडीचे इंजिनासह चार डबे नागोठणे येथे रुळावरून रविवारी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी घसरल्याने झालेल्या अपघातामध्ये २० जण जागीच ठार, तर २००हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. अपघाताचे ठिकाण नागोठणे आणि निडी स्टेशन दरम्यान आहे. कुर्ला आणि कल्याण येथून रेल्वेच्या मेडिकल रिलिफ ट्रेन घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.किरकोळ जखमींवर प्रथमोपचार करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. काही गंभीर जखमींना मुंबईच्या केईएम आणि सायन हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाहून सावंतवाडीकडे जात असलेल्या पॅसेजरचे तीन डबे रुळावरून घसरले. या अपघातात आतापर्यंत 15 जण ठार झाले आहेत. अनेक प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर अलिबाग, रोहा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घसरलेले डबे हटविण्याचे काम सुरू असून, त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. अपघातामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मंगला एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस या पनवेल-पुणे मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. तर मुंबईकडे येणारी मंगला एक्स्प्रेस खेडवरुन रत्नागिरीच्या दिशेने मागे वळवून मडगाव-लोंढा-पुणे-मुंबई अशा मार्गाने वळवली आहे. तर नेत्रावती एक्स्प्रेस रत्नागिरीकडे मागे वळवून मडगाव-लोंढा-पुणे-मुंबई अशा दिशेने वळवली आहे. त्याचबरोबर सावंतवाडी-दिवा पॅसेंजप रत्नागिरीतच थांबवली आहे. रेल्वे प्रशासनाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

अपघातामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. रुळावर घसरलेले डबे हटवण्यास वेळ लागेल, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अपघातग्रस्त गाडीत अडकलेल्या सर्व लहान मुलांना बाहेर काढण्यात आले आहे. अद्याप गाडीत ३० जण अडकले असल्याचे समजते. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर रुळावरुन घसरल्यामुळे मांडवी, मंगला, नेत्रावती आणि निजामुद्दीन एक्सप्रेस या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. 

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी एसटीच्या दहा विशेष बस घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना ५० हजाराची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. किरकोळ जखमींना पाच हजार रुपये तर जखमींना १५ हजार रुपयांची तातडीची मदत देणार असल्याचेही रेल्वेच्यावतीने सांगण्यात आले.

अपघातग्रस्तांसाठी आणि त्यांच्या नातलगांसाठी हेल्पलाइनः
02352-228176 आणि 8975555777
छत्रपती शिवाजी टर्मिनस  022-22755990 / 22694090
दादर  022-24114836
ठाणे  022 -25334840
पनवेल  022 -27468833
रत्नागिरी 02352-228176 / 228951 / 228954
सीबिडी बेलापूर  022-27561721 / 23 / 24
मृतांची नावे- भरत बळीराम सुर्वे (४९) रा. खुटालखुर्द - कृष्णा तुकाराम शिंदे (७०) रा. डोंबिवली (प.) - सुरेखा जयराम नाकते (३५) रा. काळसुली, ता. म्हसळा - विक्रांत बाळकृष्ण सुर्वे (२२) गुहागर - पिंटू गोसावी - खांदा, पनवेल - प्रदीप दगडू पारवे - इंदापूर, रायगड - मिथील दीपक जोशी - गोरेगाव, रायगड - कमलेश चंद्रकांत चव्हाण - नातवंडी, महाड - श्रद्धा संतोष वक्ते (६) काडवई, संगमेश्‍वर - सुभाष कृष्णा जाधव (४२) खेड, - वासंती काशीनाथ भुवड (६२) खेड - गणेश रामचंद्र चव्हाण (३२) महाड - अजयकुमार किसन मालुसकर (२०) उत्तर प्रदेश - प्रभुनाथ राजबर (३७) उत्तर प्रदेश - श्रुतिका संतोष पोटे (३०) संगमेश्‍वर - रुतीयान दत्तात्रेय करजू (३२) दासगाव, महाड.
जखमी रुग्णांची नावे
१) नथुराम चांबू मोरे (३८) मुलुंड
२) शिवाजी शांताराम शिंदे (३८) पौर
३) गणेश शंकर तेलंगे (३६) माणगाव
४) दिलीपकुमार उमेशप्रसाद सिंग (३१) पनवेल
५) कैलास लक्ष्मण पाचकले (२३) लणेवी
६) जान्हवी जयराम नाकती (५) पनवेल
७) सुनील सुरेश भोरतेकर (२१) कुर्ला
८) यशवंत नारायण मोहिते (६३) चिपळूण
९) सुशीला अशोक चव्हाण (२१) रोहा
१0) सुशील अशोक चव्हाण (१९) रोहा
११) सुशांत संतोष कदम (२७) कल्याण
१२) संगीता संतोष कदम (२७) कल्याण
१३) आरकेश वसंत डोलकर (दीड वर्षे) खारापटी
१४) प्रशांत जयराम साळवी (२४) पोलादपूर
१५) वामन लिंबाजी शिंदे (४५) डोंगरी
१६) महेश रघुनाथ मोरिये (४५) कणकवली
१७) प्रियांका गुरव (२0) कणकवली
१८) शैलेश लक्ष्मण शिर्के (२२) माणगाव
१९) आशिष सुरेश तुळे (२३) माळव
२0) प्राची पद्माकर दळवी (३१) मुंबई
२१) प्रियांका पद्माकर अणभवणे (२१) मुंबई
२२) नंदकुमार रमेश महसुन्कर (३८) विक्रोळी
२३) दीपक भिकाजी मोहिते (४३) मुंबई
२४) सुनंदा सखाराम गुरव (६0) रत्नागिरी
२५) सुनीता सुनील जाधव (३१) डोंबिवली
२६) वासुदेव रामोजी पवार (७९) चेंबूर
२७) सुमती काशिनाथ अनभवणे (६५) मुडेवाडी
२८) प्रभाकर काशिनाथ अनभवणे (४७) मुडेवाडी
२९) राजश्री राजाराम पवार (३१) विक्रोळी
३0) प्रमोद सखाराम पुरव (२७) रत्नागिरी
३१) सखाराम तुकाराम गुरव (६0) रत्नागिरी
३२) निखिल दामोदर जाधव (१२) दिवा
३३) सुमन गोपाळ पडवळ (४0) मुंबई (मानखुर्द)
३४) सुमन रवींद्र सळपे (१६) मुंबई
३५) रोहिणी शांताराम वैकर (६0) मराठा
३६) सदानंद तुकाराम सत्वे (२८) उणेगाव
३७) इंदिराबाई बाळकृष्ण जगदाळ (७५) मुंबई
३८) प्रमोद बारकू गायकर (२४) मोहपाडा
३९) अश्‍विनी अशोक मोहिते (४५) चिपळूण
४0) पांडुरंग अंबाजी जाधव (३३) मुंबई
४१) राजाराम सखाराम पवार (३२) विक्रोळी
४२) सुभय संदेश गायकवाड (२१) कुर्ला
४३) दिव्या धर्मा माळी (७) सुकोली
४४) दीपाली धर्मा माळी (१८) सुकोली
४५) धनश्री धर्मा माळी (४५) सुकोली
४६) पद्माकर गोपाळ दळवी (३७) कणकवली
४७) दिशा रवींद्र सळपे (१४) डोंबिवली
४८) अश्‍विनी नरेंद्र नकाशे (२९) राजापूर
४९) रिया रवींद्र दिवकर (२७) यशवंत खार
५0) सचिन दशरथ नार्वेकर (२१) सिंदुधुर्ग
५१) प्रकाश श्रीधर राणे (६0) मालवण
५२) प्रमिला प्रकाश राणे (५९) मालवण
५३) वंचिता वसंत डोलकर (३२) खारापटी
५४) अंकुश तुकाराम यादव (४७) ताम्हणी
५५) प्रभाकर जगन्नाथ दाभाडे (२३) लक्ष्मीनगर
५६) अश्फाक इस्माईल शोख (३0) वरसे
५७) निजाप्पा हसनप्पा कटीमनी (५४) उरण
५८) कल्लाव सिद्धवा गायकवाड (५0) उरण
५९) गणेश धर्मा माळी (११) सुडकोली
६0) जान्हवी जयराम नाकती
६१) विद्या सदानंद उम्बरकर (४२) श्रीवर्धन
६२) सुरज सदानंद उम्बरकर (१६) श्रीवर्धन
६३) सुशील नथुराम कानेकर (१९) एमआयडीसी धाटाव
६४) मधुसूदन रामकृष्ण कुबल (६१) मुलुंड
६५) मनीषा मधुसूदन कुबल (५२) मुलुंड
६६) देवेंद्र चंद्रकांत गमरे (३६) विरार
६७) मुक्ता अनिल गुरव (१८) कडसुली
६८) गणेश नारायण चव्हाण (३२) ठाणे
६९)) मनाली महादेव ठोंबरे (१४) मुंबई
७0) विद्या वासुदेव तांडेल (४८) दहिसर
७१) पूनम जयराम तुरे (२१) आपटे
७२) चंद्रकांत महादेव धुमाळ (५९) विरजोली
७३) नारायण सखाराम नलावडे (४१) ठाणे
७४) अनिकेत अरुण पवार (२२) वरसे
७५) सुनीता सदानंद पाटील (३३) पेण
७६) निनाद काशिनाथ बोरकर (२५) चणेरा
७७) प्रज्ञा प्रभाकर भोसले (१२) मुंबई
७८) कविता कीर्तीकुमार मांजरेकर (४९) डोंबिवली
७९) माधवी कीर्तीकुमार मांजरेकर (२२)
८0) फारुक कासिम मापकर (४६) मुंबई
८१) सुशील भागोराम मोहिते (३८) ठाणे
८२) अभिनय अरूण म्हात्रे (२५) पेण
८३) कांचन दत्तात्रेय म्हापूसकर (५३) अष्टमी
८४) उमेश गोपाळदास वैष्णव (२१) रोहा
८५) स्वप्नील सुनील शिंदे (२२) फुगारेवाडी

कोकण रेल्वेवरील आतापर्यंतचे भीषण अपघात

१९९६ ते २०१४
अपघात घडलेले वर्ष घटना मृत्यू जखमी
१९९६-१९९७    ३ - १
१९९७-१९९८    ३ - २८
१९९८-१९९९     ९ - १
१९९९-२०००    ३३ १९
२००१-२००१    ५ - १०
२००१-२००२    ३ - १५
२००२-२००३   १ २४ २५
२३-६-२००३ -  ५३ ३५
१६-६-२००४ -  २२ १००
४-५-२०१४ -   २० २००

जून २00२- वैभववाडीजवळ बेर्ले बोगद्याजवळ रेल्वेवर दरड कोसळून अपघात,
कोकण रेल्वे मार्गावरचा सगळ्यात पहिला आणि मोठा अपघात, मृतांची संख्या ५८.
१६ जून २00४ - मत्स्यगंधा एक्स्प्रेसला महाडजवळ अपघात, १५ ठार, ३८ जखमी.
जुलै २0१२ - रत्नागिरीत पोमेंडीजवळ दरड कोसळून अपघात.
ऑक्टोबर २0१३ - खेड स्टेशनजवळ कोकणकन्या एक्स्प्रेसचे इंजिन घसरले.
११ एप्रिल २0१४ - अडवली-निवसर दरम्यान मालगाडी घसरली.
१४ एप्रिल २0१४ - उक्शी स्टेशनजवळ विल्हवडे बोगद्याजवळ मालगाडीचे पाच डबे घसरले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages