रिपाइंचे ९ मेला राज्यभर आंदोलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रिपाइंचे ९ मेला राज्यभर आंदोलन

Share This
अहमदनगर जिल्ह्य़ातील नितीन आगे या तरुणाच्या हत्येसह दलितांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे संतापाची लाट उसळली असून रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांनी ९ मे रोजी राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा शनिवारी केली़.  नगर  जिल्ह्य़ात दलित अत्याचाराच्या गेल्या काही वर्षांत ११२ घटना घडल्या असल्याने हा जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जिल्हा जाहीर करण्याची मागणी आठवले यांनी केली़. दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर राज्य सरकार उदासीन आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे दलितांना संरक्षण मिळत नाही, असा आरोप आठवले यांनी केला़  सोनई हत्याकांडातील पीडीतांना न्याय मिळाला नाही. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात नाही, असेही आठवले यांनी एमआयजी क्लब येथे म्हटले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages