मुंबई : येत्या पावसाळ्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने पावसाळी कामे हाती घेतली आहेत. पावसाळ्यात दोन्ही मार्गांवरील उपनगरीय लोकलची वाहतूक सुरळीत राहावी यासाठी रेल्वे रुळांशेजारील नालेसफाई, पंप बसवणे तसेच आवश्यक तेथे पाणी रोखण्यासाठी कठडे बांधण्याची कामे सुरू झाली आहेत. मे महिन्याच्या अखेरपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने पाणी तुंबण्याच्या जागा निश्चित के ल्या असून त्याठिकाणी २0 पंप लावण्यात येणार आहेत. सीएसटी ते ठाणे मार्गावर ११, ठाणे ते कल्याण मार्गावर ३, तर सीएसटी ते मानखुर्द मार्गावर ६ पंप बसवण्यात येणार आहेत. तसेच मुंबई महापालिका सीएसटी ते ठाणे मार्गावर १४, तर सीएसटी ते मानखुर्द मार्गावर २ पंप बसवणार आहे. तसेच सीएसटी ते कांजूर मार्ग आणि कल्याण ते कांजूर मार्गदरम्यान असलेल्या नाल्यांची सफाई करण्यात आली आहे. भूमिगत वाहिन्यांची सफाईही करण्यात आली आहे. सीएसटी ते कांजूर मार्ग दरम्यानच्या ३0, कांजूर मार्ग ते ठाकुर्लीदरम्यानच्या १३ आणि सीएसटी ते मानखुर्द दरम्यानच्या २0 भूमिगत वाहिन्यांची सफाई करण्यात आली आहे.

त्याशिवाय रेल्वे स्थानकांच्या हद्दीत येणार्या झाडांच्या फांद्याही कट करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर भायखळा, परळ, सायन, घाटकोपर, भांडुप, विक्रोळी, कांजूर मार्ग, मुलुंड, ठाणे, कळवा, मुंब्रा, कल्याण आणि चुन्नाभट्टी येथे मल्टी सेक्शन डिजिटल अँलॅक्स काऊंटर लावण्यात आले असून सिग्नल यंत्रणेत पावसाचे पाणी जाऊ नये यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाइन्स, ग्रॅण्ट रोड, मुंबई सेंट्रल, एल्फिन्स्टन रोड, दादर, माहिम, वांद्रे, खार, अंधेरी, जोगेश्वरी आणि नालासोपारा या ठिकाणी पावसाचे पाणी साचते. त्यामुळे या स्थानकांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. परेवरील नाल्यांची सफाईही अंतिम टप्प्यात आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.