आद्याक्षरे लिहिणार्‍या पालिकेवर नगरसेवक गरजले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आद्याक्षरे लिहिणार्‍या पालिकेवर नगरसेवक गरजले

Share This
मुंबई : महापालिका प्रशासनाने लोकमान्य टिळक, वीरमाता जिजाबाई भोसले यांची केवळ आद्याक्षरे वापरून प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी पाठवल्यामुळे सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. या प्रस्तावात तत्काळ दुरुस्ती करा आणि भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या, असा सज्जड दम समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिला. 
प्राणिसंग्रहालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका प्रस्तावात प्रशासनाने वीरमाता जिजाबाई भोसले यांचा उल्लेख 'वी.जि.भो.' आणि लोकमान्य टिळक यांचा उल्लेख 'लो.टि.' असा केला. त्याला शिवसेनेचे नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी या आद्याक्षरांना आक्षेप घेतला. त्यांच्या या आक्षेपाला स्थायी समितीच्या अन्य सदस्यांनी पाठिंबा दिला. हा प्रस्ताव प्रशासनाला परत पाठवण्याची मागणी त्यांनी केली. समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनीही आक्षेप घेत, 'भविष्यात अशा थोर आणि आदर्शवत व्यक्तींचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे सांगून हा प्रस्ताव फक्त आद्याक्षरे दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे परत पाठवला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages