"राज्य ई प्रशासन पुरस्कार-२०१३" चे वितरण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

"राज्य ई प्रशासन पुरस्कार-२०१३" चे वितरण

Share This
महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रद्यान संचालनालया तर्फे  "राज्य ई प्रशासन पुरस्कार-२०१३" चे आज थाटामाटात वितरण करण्यात आले. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या "एकात्मिक लॉटरी व्यवस्थापन प्रणाली" या प्रकल्पाला "ई प्रशासनाच्या सहाय्याने नागरी केंद्रात सुविधांचे उत्कृष्ट प्रदान" या प्रवर्गात सुवर्ण पदक  पटकावले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश गवई, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सहमुख्य अधिकारी दिनकर जगदाळे, म्हाडाच्या आयसीटी विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल अंकलगी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर स्वाधीन क्षत्रिय (अप्पर मुख्य सचिव, महसूल), राजेश अग्रवाल (प्रधान सचिव, माहिती तंत्रद्यान संचालनालय), के. पि. बक्षी (अप्पर सचिव, नियोजन), वीरेंद्र सिंग (संचालक, माहिती तंत्रद्यान संचालनालय) आदी उपस्थित होते. पारदर्शक कार्यप्रणाली, उत्कृष्ट सेवा, कार्यकुशलता, कमी जोखमीचे आणि राष्ट्रीय संपत्ती असणार्या कागदाचा कमी वापर हे या प्रणालीचे उद्दीष्ट  आहे. गेल्या दशकात म्हाडाने सुमारे ३० हजार घरांचे वितरण सोडत प्रक्रियेद्वारे केले आहे. परवडणार्या दरातील म्हाडाच्या सदनिकांसाठी लाखो अर्ज प्राप्त होत असतात. या सोडतीविषयीची  माहिती तसेच पारदर्शक व बिनचूक सोडत घडवून आणण्यासाठी म्हाडाला या प्रणालीचा खूप फायदा होत आहे
Displaying DSC_0701.JPG

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages