मुंबई - छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये आज तीन गाड्यांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्याने खळबळ माजली. या गाड्यांचे आग लागलेले डबे बाजूला काढण्यात आले. या घटनांमुळे मध्य रेल्वेचे प्रशासन हादरून गेले आहे.
"मुंबई-पुणे डेक्कन क्वीन'च्या दुसऱ्या दर्जाच्या चेअर कारमध्ये सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली. ओव्हरहेड वायरचा वीजपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला. या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. आग लागलेला डबा तपासणीसाठी बाजूला काढण्यात आला. त्यानंतर ही गाडी सायंकाळी सव्वासहा वाजता सुटली. कोल्हापूरला जाणाऱ्या सह्याद्री एक्स्प्रेसमधून धूर येत असल्याने गोंधळ उडाला. फलाट क्रमांक 9 वर ही गाडी उभी होती. एस-5 या कोचमधून सायंकाळी पावणेसहा वाजता धूर येऊ लागला. ही गाडी सायंकाळी 7.07 वाजता सीएसटी येथून सुटली. फलाट क्रमांक 15 वरील मुंबई-हावडा व्हाया नागपूर या गाडीतूनही धूर येत असल्याचे 6.10 वाजता दिसले. या गाड्यांचे आग लागलेले डबे चौकशीसाठी बाजूला काढण्यात आले आहेत.
या घटनांमुळे मध्य रेल्वेच्या उपनगरी सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. डेक्कन क्वीनच्या टॉयलेटमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. रेल्वे प्रशासन याबाबत अधिक चौकशी करीत आहे.