एन विभागाच्या हद्दीमध्ये ३६ अनधिकृत तबेले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एन विभागाच्या हद्दीमध्ये ३६ अनधिकृत तबेले

Share This

मुंबई / अजेयकुमार जाधव 

पालिकेच्या 'एन' विभागाच्या हद्दीत तब्बल ३६ अनधिकृत आणि अवघे सात अधिकृत तबेले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. ही आकडेवारी माहिती अधिकारातून मागितली होती; पण ती देण्यासाठी आरोग्य विभागाने तब्बल तीन वर्षांचा कालावधी लावला, मात्र त्यासाठीही माहिती आयोगाचे दरवाजे ठोठवावे लागले. या ३६ अनधिकृत तबेल्यांमध्ये एकूण ४६0 जनावरे ठेवण्यात आली आहेत. तीन वर्षाने तेही माहिती आयोगाच्या आदेश  नंतर माहिती दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

घाटकोपर 'एन' विभागाच्या हद्दीत किती अधिकृत आणि अनधिकृत तबेले आहेत, याची विचारणा आनंद पारगावकर यांनी माहितीच्या अधिकारात २0११ मध्ये मागितली होती; पण पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी ही आकडेवारी देण्यासाठी टाळाटाळ करत होते. यामुळे पारगावकर यांनी मुख्य माहिती आयुक्तांकडे या संदर्भात अपील केल्यावर सुनावणी झाली आणि ही माहिती तत्काळ मोफत द्यावी, असे आदेश आयोगाने दिले. 'एन' विभागाच्या हद्दीत ३६ अनधिकृत तबेले असून फक्त सात अधिकृत तबेले आहेत, अशी माहिती देण्यात आली. सर्वाधिक ९६ जनावरे घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालयाजवळील राम यादवकडे असून पारशीवाडी येथील दूधनाथ यादवकडे ६२ आणि शेजनारायण दुबेकडे ३0 जनावरे, विक्रोळी पार्कसाईट येथील राधेश्याम यादवकडे २0 जनावरे आहेत, अन्य बेकायदेशीर तबेलाधारकांकडे कमीतकमी दोन ते ११ जनावरे आहेत. याच विभागात बलदेव पांडे, रामबिहारी यादव, बलराम यादव, अनुभवना गोसावी, नंदलाल तिवारी, बलधर देवनाथ आणि मालतीदेवी मौर्या हे तबेलेधारक अधिकृत आहेत. पारशीवाडी येथील अनुभवना गोसावी यांच्याकडे सर्वाधिक २0 जनावरे आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages