टीसी संपत साळुंखे निर्दोष - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 May 2014

टीसी संपत साळुंखे निर्दोष

मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comजळगाव येथे चालत्या एक्स्प्रेसमध्ये चढताना पाय घसरून उज्ज्वला पंड्या या ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रीकरण झाले आहे. त्यामुळे या घटनेत टीसी संपत साळुंखे हे निर्दोष असल्याचे शुक्रवारी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.
गुरुवारी पहाटे जळगाव रेल्वे स्थानकात राजेंद्र नगर जनता एक्स्प्रेस गाडीतून पडून उज्ज्वला पंड्या या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेला टीसी संपत साळुंखे जबाबदार असल्याचे सांगत त्यांनीच पंड्या यांना गाडीतून बाहेर ढकलल्याचा आरोप करण्यात आला. त्या वेळी संतप्त प्रवाशांनी टीसीला बेदम मारहाण केली. अखेर मध्य रेल्वेने सीसीटीव्हीमध्ये झालेल्या चित्रीकरणाचे फूटेज मागवले. त्यामध्ये त्या महिलेला स्टेशनवर सोडण्यास आलेला राहुल पुरोहित हा गाडी सुटण्याची वेळ झालेली असताना स्टेशनवरील एका बाकड्यावर बसला. पुरोहित याच्या मागून हातात बॅग घेऊन ती महिला गाडी पकडायचे सोडून पुरोहित याच्याकडे वळली. तेवढय़ात गाडी सुटल्याचे लक्षात येताच त्या महिलेने आपल्या मुलीला डब्यात चढवले; पण स्वत: धावती गाडी पकडत असताना तिचा पाय घसरल्याचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. 

याच सीसीटीव्हीचा आधार घेत टीसी साळुंखे निर्दोष असल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. या अपघातावेळी साळुंखे हे मद्यधुंद होते, असा आरोपही करण्यात आला होता; परंतु वैद्यकीय तपासणीमध्ये ते मद्यधुंद नसल्याचे आढळून आले आहे. तसा अहवालही डॉक्टरांनी दिला असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.
JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS