दहा कोटी युजर्सकडून नंबर पोर्टेबिलिटीचा वापर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 May 2014

दहा कोटी युजर्सकडून नंबर पोर्टेबिलिटीचा वापर

मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comभारतातील मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीचा (एमएनपी) वापर करणाऱ्या युजर्सची संख्या आता 10 कोटींच्या घरात पोचली आहे. देशभरातील एकूण मोबाईल युजर्सपैकी सुमारे 11 टक्के युजर्सनी ही सुविधा वापरली आहे, असे दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) आकडेवारीवरून दिसून येत आहे. 
एमएनपीच्या सेवेनुसार एका दूरसंचार सेवा पुरवठादाराकडून दुसऱ्या दूरसंचार सेवा पुरवठादाराची सेवा निवडण्याचा पर्याय मिळतो. मोबाईल नंबर न बदलता सेवा पुरवठादार बदलण्याची सुविधा ट्रायमार्फत जानेवारी 2011 ला देण्यात आली होती. सध्या एमएनपी सेवेसाठी 19 रुपये आकारले जातात. 2011 मध्ये एमएनपीविषयीची विनंती नाकारणाऱ्यांचे प्रमाण 40 टक्के होते, ते आता 11 टक्‍क्‍यांवर आले आहे. 

पुरेशा कारणाशिवाय एमएनपी सेवा नाकारल्यामुळे दूरसंचार सेवा पुरवठादारांकडून ट्रायने आतापर्यंत 8 कोटींची दंडवसुली केली आहे. एमएनपीच्या नियमावलीचा भंग केल्यामुळेच कंपन्यांवर ही कारवाई झाली आहे. या वर्षापासून कॉर्पोरेट पोर्टिंगची सुविधाही सुरू करण्यात आली आहे. एखाद्या कंपनीच्या नावे घेतलेल्या मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी अधिकृत सेवा पुरवठादार कंपनीच्या प्रतिनिधीमार्फत एमएनपीची सुविधा देण्यात येते.
-
JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS