मुंबई / मुकेश धावडे - राजेंद्रनगर वसाहतीत म्हाडाने 1980 मध्ये बांधलेल्या 6 इमारती पालिकेने वर्षभरापूर्वी अतिधोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत.भाडेकरूंनी त्याचवेळी इमारतीतील खोल्या खाली देखील केल्या आहेत. इमारत क्र.18,19,20 या सिद्धिविनायक सोसायटीतील तळमजल्यावर असलेल्या शिधावाटप कार्यालयाचे रेकोर्ड व उपाहारगृह इतरत्र हलविण्यात आलेले नसल्यामुळे या इमारती पडण्यास शिधावाटप कार्यालयाचा अडसर येत असून एखादी दुर्घटना होवून जीवित्त वा वित्त हानी झाल्यास महापालिका त्याला जबाबदार राहणार नसल्याचे आर /मध्य पालिकेचे सहाय्यक आयुक्त विजयानंद बोले यांनी सांगितले आहे.
बोरीवली पूर्वे येथे 1980 मध्ये म्हाडाने राजेंद्र नगर गृहनिर्माण ही मोठी नागरी वसाहत बांधलेली आहे. मोडकळीस आलेल्या येथील 6 इमारतींना पालिकेने 4 ऑक्टोबर 2013 ला 354 ची नोटीस देवून अति धोकादायक घोषित केले आहे.16 मे 2014 रोजी सोसायटीचे अध्यक्ष, सचिव,शिधावाटप कार्यालयाचे सबंधित अधिकारी यांना परत 354 ची नोटीस देवूनही त्यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.रहिवाश्यांनी खोल्या खाली केल्या नंतर कुमार विकासकाने त्यांची इतरत्र राहण्याची व्यवस्था केली. इमारत क्र.18,19 मधील तळमजल्यावर असलेले रेशनिंग कार्यालय त्याचवेळी शेजारी असलेल्या पत्रकार भवन मध्ये तळमजल्यावर हलविण्यात आले.कार्यालयाचे रेकोर्ड व उपाहारगृह मात्र तेथेच ठेवण्यात आले आहे.विकसकाने सहा पैकी तीन इमारती पडलेल्या आहेत,मात्र इमारत क्र.18,19,20 या इमारती पाडण्यास शिधावाटप कार्यालयाचा अडसर येत आहे.एखादी दुर्घटना झाल्यास शिधावाटप कार्यालयाचे रेकोर्ड पाहण्यासाठी येणारे कर्मचारी,उपाहारगृह चालविणारे कर्मचारी तसेच इमारत क्र.20च्या मागे असलेल्या सीसीआय चाळीत राहणाऱ्या रहिवाश्यांची जीवित्त वा वित्त हानी होण्याची दाट शक्यता आहे.14 मार्च 2014 रोजी सांताक्रुज वाकोला यशवंत नगर मधील शंकरलोक अपार्टमेंट शेजारील क्यथेरिन या बैठ्या चाळीवर पडून चाळीतील 7 रहिवाश्यांचा मृत्यू तर काही गंभीर जखमी होवून जीवित व वित्तहानी झाली होती.
इमारत क्र.18,19,20 या सिद्धिविनायक सोसायटीतील तळमजल्यावर असलेल्या शिधावाटप कार्यालयाचे रेकोर्ड व उपाहारगृह इतरत्र हलविण्यात आलेले नसल्यामुळे या इमारती पडण्यास शिधावाटप कार्यालयाचा अडसर येत असून एखादी दुर्घटना होवून जीवित्त वा वित्त हानी झाल्यास महापालिका त्याला जबाबदार राहणार नसल्याचे आर /मध्य पालिकेचे सहाय्यक आयुक्त विजयानंद बोले यांनी सांगितले आहे.पालिका आयुक्त सीताराम कुंठे आणि म्हाडाचे कार्यकारी अभियंता बी. एफ.काळे यांनी नुकतीच या इमारती ची पाहणी केली.त्यावेळी ही इमारत अ तिधोकादायक असल्याने कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका असल्याने ती आठ दिवसात पाडण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी म्हाडाच्या अभियंत्यांना दिले आहेत.शिधावाटप कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी यांना पालिकेकडून सतत पत्रव्यवहार करून देखील त्यांचाकडून कोणतेही स्पष्टीकरण आजतागायात करण्यात आलेले नसल्याने त्यांच्या कर्मचार्यांची देखील त्यांना काळजी नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान म्हाडा व सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यानेच अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारत क्र.18,19,20 पाडण्यास अडथला येत असल्याचे सिद्धिविनायक सोसायटीतील रहिवाश्यांनी सांगितले.
