मंत्रीपद न मिळाल्याने आठवले, राजू शेट्टी नाराज - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मंत्रीपद न मिळाल्याने आठवले, राजू शेट्टी नाराज

Share This
मुंबई/जेपीएन न्यूज: नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी हे नाराज झाले आहेत. मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने महायुतीचे घटक असलेल्या या दोन पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. 


खा. रामदास आठवले यांनी मंत्रीपदासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. त्यांनी भाजपाच्या अनेक नेत्यांच्या भेटीही घेतल्या. त्यांनी नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. त्यांना मंत्रीपद दिले जाईल, असे आश्‍वासनही देण्यात आले होते, मात्र आठवले यांना मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने आठवले यांनी मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहण्याचे टाळले. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनीही आपल्या कौशल्याचा वापर करून न घेतल्याची खंत व्यक्त केली आहे. मला मंत्रीपदापेक्षा प्रश्नांमध्ये जास्त रस आहे. ते प्रश्न सुटले नाहीत तर योग्य वेळी माझे उपद्रवमूल्य दाखवून देईन, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages