नवी दिल्ली : महिला आणि लहान मुलांविषयीच्या तक्रारी मांडण्यासाठी लवकरच एक स्वतंत्र फेसबुक पेज तयार केले जाणार असल्याची घोषणा महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी आज (बुधवार) केली. महिला आणि लहान मुलांवरील अत्याचार, गुन्हे आणि छळासंबंधांतील माहिती देण्यासाठी असे पेज तयार केले जाईल, असे त्या म्हणाल्या. या पेजवर तक्रारी मांडणाऱ्यांशी या मंत्रालयातील अधिकारी थेट संवाद साधतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, महिलांसाठी एक ई-मेलवर आधारित हेल्पलाईनही सुरू केली जाणार आहे. मनेका गांधी यांनी आज मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर तातडीने त्यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
Post Top Ad
29 May 2014
Home
Unlabelled
महिलांच्या तक्रारी मांडण्यासाठी स्वतंत्र 'फेसबुक पेज'
महिलांच्या तक्रारी मांडण्यासाठी स्वतंत्र 'फेसबुक पेज'
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

