
मुंबई/जेपीएन न्यूज: येणारा पावसाळा हा सर्व मुंबईकरांना कोणताही त्रास न होता त्यांचे दैनंदिन जनजीवन सुरळीत होईल, अशी कामे महापालिकेने केलेली आहेत. तसेच संबंधित असणाऱया सर्व प्राधिकरणांनी एकमेकांशी उत्तम समन्वय साधून येणारा पावसाळा आनंददायी ठरेल असे पहावे, असे आवाहन मुंबईचे महापौर सुनिल प्रभु यांनी मान्सूनपूर्व विविध कामांच्या आढावा बैठकीत सर्व प्राधिकरणांना केले.
संपूर्ण बृहन्मुंबईतील विविध विभागातील पावसाची नोंद व्हावी म्हणून येत्या पावसाळ्यात ६५ ठिकाणी पर्जन्यमापक संयंत्रे बसविण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत विभागीय पातळीवर सहाय्यक आयुक्तांना रु.१,००,०००/- एवढा विशेष निधी देण्यात आला आहे. दिनांक २१ मे, २०१४ पर्यंत एकूण ३२० कि.मी. लांबीच्या नाल्यांपैकी २६६ कि.मी. नाल्यांची साफसफाई केली आहे. या नाल्यातून एकूण ३,६५,००० क्युबिक मीटर पैकी ३,००,००० क्युबिक मीटर गाळ तर मिठी नदीतील एकूण २,५०,००० क्युबिक मीटर गाळ २,००,००० म्हणजेच एकूण ६,१५,००० क्युबिक मीटर पैकी ५,००,००० क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. म्हणजेच एकूण ८३ टक्के काम पूर्ण झाले आहे. ३० कि.मी. लांबीची आर्च ड्रेन साफ केलेली असून नाल्यांच्या १८५ पातमुखांचीही सफाई करण्यात आलेली आहे. संभाव्य दुर्घटना अथवा पाणी साचल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थलांतरीत करावे लागल्यास महापालिकेच्या शाळा ‘तात्पुरती निवारास्थाने’ म्हणून तयार ठेवण्यात आल्या आहेत. ३१ मे, २०१४ पर्यंत रस्त्यांची सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. मात्र अपवादात्मक परिस्थितीत ही सर्व कामे कोणत्याही परिस्थितीत ५ जून २०१४ पर्यंत पूर्ण केली जातील. पावसाळ्यात झाडे उन्मळून पडू नयेत म्हणून वृक्ष छाटणीची कामे सर्व विभागात प्रगतीपथावर आहेत अशी माहिती प्रभू यांनी दिली
आपत्कालीन परिस्थितीशी समर्थपणे सामना करता यावा म्हणून ३,८३१ बेडस् ची सोय करण्यात आली आहे. त्यामध्ये ५०० अतिरिक्त बेडस् चीही सोय करता येईल, अशी सुसज्ज यंत्रणा पालिका रुग्णालयात १ जून, २०१४ पासून कार्यान्वित करण्यात येत आहे. तसेच गत २ वर्षाप्रमाणे ‘झिरो बेड पॉलिसी’ कार्यान्वित करण्यात आली आहे. पावसाळ्यात सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) कार्यान्वित करण्यात येणार आहे. या सर्व वैद्यकीय सेवा-सुविधा प्रयोगशाळा सुविधांसह उपलब्ध करुन देण्यात येत असून याबाबतच्या तक्रार निवारण करण्यासाठी ‘तक्रार निवारण डेस्क’ कार्यान्वित करण्यात येणार आहे. मलेरिया व डेंग्यू नियंत्रणाकरीता विभागीय पातळीवर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून गतवर्षीप्रमाणेच ‘फाईट द बाईट’ हे जनजागृती अभियान चालू ठेवण्यात येणार आहे. डेंग्यू-२ हा डेंग्यू-१ पेक्षाही घातक असल्याने त्याबाबत जनजागृती व कार्यवाही सर्व विभागीय पातळीवर प्रभावीपणे करण्यात येणार आहे. डेंग्यू व मलेरिया बाबतची अद्ययावत माहिती भ्रमणध्वनी व संकेतस्थळ (वेबसाईट) वर टाकण्यात येणार आहे. तसेच गत २ वर्षाप्रमाणे ‘झिरो बेड पॉलिसी’ कार्यान्वित करण्यात आली आहे. पावसाळ्यात सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) कार्यान्वित करण्यात येणार आहे. या सर्व वैद्यकीय सेवा-सुविधा प्रयोगशाळा सुविधांसह उपलब्ध करुन देण्यात येत असून याबाबतच्या तक्रार निवारण करण्यासाठी ‘तक्रार निवारण डेस्क’ कार्यान्वित करण्यात येणार आहे. मलेरिया व डेंग्यू नियंत्रणाकरीता विभागीय पातळीवर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून गतवर्षीप्रमाणेच ‘फाईट द बाईट’ हे जनजागृती अभियान चालू ठेवण्यात येणार आहे. डेंग्यू-२ हा डेंग्यू-१ पेक्षाही घातक असल्याने त्याबाबत जनजागृती व कार्यवाही सर्व विभागीय पातळीवर प्रभावीपणे करण्यात येणार आहे. डेंग्यू व मलेरिया बाबतची अद्ययावत माहिती भ्रमणध्वनी व संकेतस्थळ (वेबसाईट) वर टाकण्यात येणार आहे असे प्रभू यांनी सांगितले.
अग्निशमन दलाची ६ कमांडींग सेंटर्स कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी सर्व साधनांसह सज्ज करण्यात आली आहेत. बृहन्मुंबईतील ६ चौपाटय़ांवर ५१ जीवरक्षक नेमण्यात येणार आहेत. अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलास सुसज्ज ठेवण्यात येणार आहे. भारतीय नौदल, भारतीय लष्कर, भारतीय तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांना आपत्कालीन परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी सर्व-त्या सामुग्री व साधनांसह कार्यान्वित करण्यात आले आहे. ‘डायव्हिंग टीम’ सह भारतीय नौदलाच्या ९ ‘रेस्क्यू टीम’ सज्ज ठेवण्यात येणार आहे.मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी यांना दरडी कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच तेथे राहणाऱया नागरिकांत जनजागृती व्हावी म्हणून सर्व-त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीतील मिठी नदीची साफसफाई करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या पावसाळ्यात सर्व संबंधित आपत्ती प्राधिकरणांशी पालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षाशी उत्तम प्रकारचा समन्वय साधून योग्य ती कार्यवाही करावी व येणारा पावसाळा मुंबईकरांना सुखकारक व मुंबईकरांचे जनजीवन सुरळीतपणे राहील, याकामी सहकार्य करावे, असे आवाहन मुंबईचे महापौर प्रभु व महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी केले आहे.
