कँपा-कोला प्रकरणी तोडगा काढण्याचे आदेश नाहीच - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कँपा-कोला प्रकरणी तोडगा काढण्याचे आदेश नाहीच

Share This
मुंबई : वरळीतील कँपा-कोला कंपाऊंडमधील सात बेकायदा इमारती पाडण्याच्या आधी पालिकेने तोडगा काढावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, असा दावा करणार्‍या 'कँपा-कोला'मधील रहिवासी याबाबतच्या निर्देशाची प्रत मात्र पत्रकारांना देण्यासाठी असर्मथ ठरले. कँपामधील रहिवाशांनी गुरुवारी वरळी येथे पत्रकार परिषद बोलावून, इमारती पाडण्याआधी महापालिकेने तोडगा काढावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, असा दावा केला, मात्र त्याची प्रत देण्यास रहिवासी असर्मथ ठरले. पावसाळा होईपर्यंत कँपामधील इमारती तोडू नयेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असे रहिवाशांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages