पम्पिंग स्टेशनची कामे रखडली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पम्पिंग स्टेशनची कामे रखडली

Share This
मुंबई/जेपीएन न्यूज: पावसाळ्यात मुंबईच्या शहरी भागांत साचणाऱ्या पाण्याचा उपसा करण्यासाठी लव्हग्रोव्ह आणि क्‍लिव्हलॅण्ड पम्पिंग स्टेशन महत्त्वाची आहेत; परंतु यंदा त्यांची कामे पूर्ण होण्याची शक्‍यता नाही. ही कामे करणाऱ्या युनिटी कन्स्ट्रक्‍शनकडे पैसे नसल्याने ती रखडली आहेत. हा प्रकार गंभीर आहे. तातडीने कामे मार्गी लावा आणि मुंबईकरांना दिलासा द्या, अशी सूचना काल (ता. 26) विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी प्रशासनाला केली. 
लव्हग्रोव्ह आणि क्‍लिव्हलॅण्ड पम्पिंग स्टेशनच्या कामांची वर्कऑर्डर 2010 मध्ये देण्यात आली होती; परंतु प्रकल्पाच्या बाजूला बेकायदा झोपड्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष काम 2012 मध्ये सुरू झाले. लव्हग्रोव्हचे काम 116 कोटींना, तर क्‍लिव्हलॅण्डचे काम 112 कोटींना देण्यात आले. कामाला उशीर झाल्याने कंत्राटदाराला 30 लाखांपर्यंत दंड आकारण्यात आला. आता कंत्राटदाराकडे पैसे नसल्याने कामे रखडली आहेत, अशी माहिती आंबेरकर यांनी दिली. ही कामे तातडीने पूर्ण करा, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages