विद्यार्थ्यांना २७ वस्तू देण्यासाठी पालिका ३१ कोटी अधिक खर्च करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विद्यार्थ्यांना २७ वस्तू देण्यासाठी पालिका ३१ कोटी अधिक खर्च करणार

Share This
मुंबई : महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणार्‍या २७ प्रकारच्या विविध वस्तूंच्या पुरवठय़ासाठी पालिका या वर्षी आणखी ३१ कोटी ५0 लाख रुपये अतिरिक्त खर्च करणार आहे. पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना बूट, गणवेश, कंपास, दप्तर आणि वह्या आदी २७ प्रकारच्या वस्तू देण्यात येतात.
२0१४-१५ या शैक्षणिक वर्षासाठी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी २७ प्रकारच्या वस्तू पुरवण्यासाठी एकूण २१६ कोटी ९६ लाख रुपये खर्चणार आहे. पालिका पहिली ते १0 वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टेशनरीवर २१ कोटी २६ लाख ९0 हजार रुपये खर्चणार होती. त्यात आणखी एक कोटी १९ लाख ३२ हजार रुपये अतिरिक्त खर्च होणार आहेत. गणवेशासाठीही १५ कोटी ७0 लाख रुपये अतिरिक्त खर्चणार असून, शालेय दप्तरांसाठी ३७ कोटी ६६ लाख ७२ हजार १२२ रुपये खर्चणार होती, पण आता सहा कोटी ४८ लाख ९७ हजार ९६७ रुपये अतिरिक्त खर्चणार आहे. बुटांसाठी १७ कोटी २७ लाख ७0 हजार ४४६ रुपये खर्च होणार होते, त्यात तीन कोटी ७४ लाख ९८ हजार अतिरिक्त खर्च होणार आहेत. वह्यांसाठी १८ कोटी ४५ लाख ७९ हजार रुपये खर्चणार होती, त्यात आता चार कोटी ३६ लाख ७२ हजार रुपये अतिरिक्त खर्च होणार आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages