दुर्बल घटकांना शिक्षणाच्या आणखी संधी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दुर्बल घटकांना शिक्षणाच्या आणखी संधी

Share This
मुंबई : 'आरटीई'अंतर्गत वंचित, दुर्बल घटकांना मोफत शिक्षणाच्या प्रवेशासाठी दुसरी फेरी २३ ते ३१ मेपर्यंत सुरू होणार आहे. यासाठी महापालिकेच्या १२ शाळा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यांची नावे : सुफा हायस्कूल, बालाजी दवाखान्याजवळ (भायखळा-पूर्व), बंगाली एज्युकेशन सोसायटी, नायगाव (दादर), नवबालोद्यान साने गुरुजी इंग्लिश स्कूल (दादर), एसआयईएस प्रायमरी इंग्रजी स्कूल (माटुंगा -पूर्व), स्टॅनिस्लॉस हायस्कूल (वांद्रे-प), पार्ले टिळक विद्यालय (विलेपार्ले-पू), बालनिकेतन प्रायमरी स्कूल (कांदिवली-प), नूतन विद्यामंदिर, बीएआरसी(मानखुर्द-पूर्व), केदारनाथ इंग्लिश स्कूल ( नेहरूनगर-कुर्ला), सेंट फ्रान्सिस झेविअर्स स्कूल (कांजूर मार्ग, भांडुप-पूर्व), एंजल्स लँड (अंधेरी-प), एसआयईएस प्रायमरी इंग्रजी स्कूल (माटुंगा-पूर्व). सोडतीमध्ये निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी पुन्हा २५ टक्के आरक्षणाअंतर्गत ऑनलाईन अर्ज करू नयेत, असे आवाहन पालिकेच्या शिक्षण विभागाने केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages