मुंबई - वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मुंबईतील पहिल्या मेट्रो मार्गाकरिता सुरक्षापत्र मिळाल्यानंतर आता केवळ रेल्वे बोर्डाचा हिरवा कंदील मिळणे बाकी आहे. एकदा रेल्वे बोर्डाने परवानगी दिली की त्यानंतर सात दिवसांत मेट्रो रेल्वे सुरू होणार आहे.
दोनच दिवसांपूर्वी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मुंबई मेट्रोला सुरक्षापत्र दिले आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता मुंबई मेट्रो वन प्रा. लि. (एमएमओपीएल) ला केवळ रोलिंग स्टॉककरिता रेल्वे बोर्डाच्या परवानगीची गरज आहे. त्यासाठीची आवश्यक कागदपत्रे 22 एप्रिल 2014 रोजीच सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे ही परवानगी मिळाल्यानंतर सात दिवसांमध्ये मेट्रो रेल्वे सुरू करण्यात येईल, असे एमएमओपीएलने सांगितले. अलीकडेच केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेला केंद्रीय मेट्रो कायद्यात समाविष्ट केले आहे. त्यामुळे मेट्रो सुरू होण्यापूर्वीच रिलायन्सने दर वाढविण्याची मागणी केली आहे.