मध्य रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाईचा वेग वाढविण्याचे निर्देश - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मध्य रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाईचा वेग वाढविण्याचे निर्देश

Share This
मुंबई - मध्य रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाई अपेक्षेप्रमाणे वेगाने होत नसल्याचे महानगरपालिकेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. यामुळे नालेसफाईचा वेग वाढविण्याचे निर्देश पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी रेल्वेला दिले आहेत.
पूर्व उपनगरात सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, भांडुप, मुलुंड येथे रेल्वेच्या हद्दीतून मोठे नाले जातात. तसेच रेल्वे रुळाच्या बाजूनेही पर्जन्यपीटिका असून त्यातून पावसाचे पाणी या मोठ्या नाल्यांमध्ये सोडले जाते. अनेक ठिकाणी तर या पर्जन्यपीटिका गायबच झाल्या आहेत. त्यामुळे पावसाळी पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन रेल्वे रुळांवर पाणी साचून वाहतुकीवर परिणाम होतो. 

पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी काही दिवसांपूर्वी पालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबरच पूर्व उपनगरातील नालेसफाईची पाहणी केली होती. यात रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाईची पाहणी केली असता ती अपेक्षापेक्षा कमी वेगाने सुरू असल्याचे आढळून आले, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच हे नाले वेळीच साफ न झाल्यास पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचल्यावर त्याचा परिणाम बाहेरील रस्त्यावर होतो. पाणी वाहून जाण्यास जागा नसल्याने रस्त्यावर पाणी साचते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. 

रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाई रेल्वेमार्फत केली जाते. रेल्वे रुळांवरील पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने न झाल्यास हे पाणी रस्त्यावरही साचते. यामुळे रेल्वेहद्दीतील नालेसफाईकडे पालिकेचे लक्ष असते. या नालेसफाईसाठी पालिकेने सुमारे दोन कोटी रुपये रेल्वेला दिले आहेत. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages