महामार्गाखालील नाल्यांचे रुंदीकरण लवकर पूर्ण करा- आयुक्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महामार्गाखालील नाल्यांचे रुंदीकरण लवकर पूर्ण करा- आयुक्त

Share This
मुंबई/जेपीएन न्यूज: पूर्व उपनगरातील नालेसफाईची कामे समाधानकारकपणे करण्यात येत असून, राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बॉम्बे ऑक्सिजन नाला, उषानगर नाला, नानेपाडा नाला या नाल्यांचे पूर्व द्रुतगती महामार्गाखालील रुंदीकरण त्वरित हाती घ्यावे व पूर्ण करावे, अशी विनंती पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्यामल मुखर्जी यांना केली आहे. 

कुंटे व मुखर्जी यांनी मंगळवारी पूर्व द्रुतगती महामार्गावरील प्रियदर्शनी जंक्शन, पोस्टल कॉलनी, छेडा नगर, अमर महाल पुलाखाली मानखुर्द जंक्शनजवळील सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड येथील रस्त्यांची पाहणी केली. पूर्व द्रुतगती महामार्गावर आणि पदपथावर तसेच सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड जेथे संपतो तेथेही डेब्रिज आढळली. तसेच तेथील बॉक्स ड्रेनची सफाई अर्धवट झाली असल्याचेही आढळले. द्रुतगती महामार्ग आणि सर्व्हिस रोड यांच्यात असलेल्या बंदिस्त नाल्यांवरील झाकणे व पेव्हर ब्लॉक्स व पाण्याचा निचरा होणार्‍या जागा आठवड्यात साफ कराव्यात, असे ठरवण्यात आले. विक्रोळी गोदरेज कंपनी अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या पदपथाचे काम समतलीकरण तसेच कामराज नगर, विक्रोळी येथील बंदिस्त बॉक्स ड्रेनची कामे आठ-दहा दिवसात पूर्ण करावीत, असे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages