पालिकेच्या प्रभाग क्र. १३५ मध्ये २९ जूनला पोटनिवडणूक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 May 2014

पालिकेच्या प्रभाग क्र. १३५ मध्ये २९ जूनला पोटनिवडणूक

मुंबई/जेपीएन न्यूज: अपक्ष नगरसेविका हनिफा बी यांच्या मृत्यूमुळे पालिकेच्या प्रभाग क्र. १३५ मध्ये २९ जून रोजी पोटनिवडणूक होणार असल्याची माहिती राज्याच्या निवडणूक आयोगाने मंगळवारी दिली. यामुळे या विभागात आचारसंहिता लागू झाली आहे. 

७५ वर्षांच्या हनिफा बी या पालिकेच्या प्रभाग क्र. १३५ मधून निवडून आल्या होत्या. मात्र सहा महिन्यांपूर्वी त्यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यामुळे या विभागात नगरसेवक नसल्याने पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. येथे निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसाठी ३ जून रोजी अर्ज दाखल करता येणार असून २९ जूनला मतदान होणार आहे व ३0 जून रोजी मतमोजणी होईल. विभाग क्र. ११२ मध्येही मनसेच्या प्रियांका श्रृंगारे या नगरसेविकेचे पद रद्द झाले आहे. येथेही पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे या विभागात पोटनिवडणुकीची घोषणा झालेली नाही.

Post Bottom Ad

JPN NEWS