सुप्रीम कोर्टाने निवृत्त विमानवाहक युद्धनौका 'आयएनएस विक्रांत'च्या लिलावास स्थगिती देऊन 'परिस्थिती जैसे थे' ठेवण्याचा आदेश दिला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या १९७१ च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारी मॅजेस्टिक श्रेणीची ब्रिटीश बनावटीची विमानवाहक युद्धनौका 'आयएनएस विक्रांत' भारताने आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी भंगार म्हणून विकली आहे. कंपनीने लिलावात सहभागी होण्यासाठी तीन कोटी आणि जहाज खरेदी करण्यासाठी ६० कोटी रुपये मोजले होते. करारानुसार २० मे पर्यंत आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जहाज तुकडे करुन टप्प्याटप्प्याने मुंबई बंदरातून बाहेर नेणार होती. ही प्रक्रिया सुरू असतानाच किरण पैंगणकर यांनी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका करुन 'विक्रांत'ची लिलाव प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टाने पैंगणकर यांच्या याचिकेची सुनावणी करुन आज (५ मे २०१४, सोमवार) लिलावास स्थगिती देऊन 'परिस्थिती जैसे थे' ठेवण्याचा आदेश दिला.