मुंबई : वर्साेवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रो मार्गिकेचा प्रवास लवकरच सर्वसामान्यांना करण्याची आशा असली तरीही मेट्रो तिकिटाचा दर वाढविण्याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. वर्साेवा-अंधेरी-घाटकोपर या ११.४ किमी या पहिल्या मेट्रो मार्गातील सुरक्षा प्रमाणपत्राचा अडसर दूर झाला असून पहिले तिकीट दर निश्चित करण्याचे अधिकार केंद्रीय मेट्रो अँक्टनुसार रिलायन्स इन्फ्राच्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून करारानुसार ठरविण्यात येणार आहेत.
रेल्वे मंत्रालयाकडून मेट्रोच्या डब्यांना परवानगी मिळाली असून तिकिटाचे दर ठरविल्यानंतरच मेट्रोतून प्रवास करण्याचे स्वप्न साकार होणार आहे. एमएमआरडीए, रिलायन्स एनर्जी व वेओलिया, फ्रान्स यांची संयुक्तपणे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड स्थापन करण्यात आली आहे. भागधारकांच्या करारावर ७ मार्च २00७ मध्ये सह्या झाल्या त्यावेळेस मेट्रोचे भाडे ९ ते १३ रुपये ठरविण्यात आले होते. ट्राम वे अँक्टनुसार दर तीन वर्षांनी ११ टक्क्यांनी तिकिटात वाढ होणार आहे. या वाढीव खर्चामुळे रिलायन्स इन्फ्राने २२ ते ३३ रुपये तिकिटात वाढ मागितली होती. राज्य सरकारने ही वाढ नाकारली आहे. नोव्हेंबर २0१३ मध्ये मेट्रोसाठी केंद्रीय मेट्रो अँक्टमध्ये समाविष्ट झाली आहे. त्यामुळे यानुसार करारानुसार मेट्रो दरात वाढ करणे अपेक्षित नसल्याने तिकीट दराचा आग्रह एमएमओपीएलकडून करण्यात येणार आहे.