तांत्रिक बिघाडांवर परेची विशेष योजना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तांत्रिक बिघाडांवर परेची विशेष योजना

Share This
मुंबई : रेल्वेच्या वारंवार होणार्‍या बिघाडावर उपाय म्हणून पश्‍चिम रेल्वेने काही विशेष योजना हाती घेतल्या आहेत. त्यामध्ये बोरिवलीतील क्रॉसओव्हरची जागा बदलणे, अंधेरी यार्डचे रिमॉडेलिंग करणे, हार्बरवर १२ डब्यांच्या गाड्या चालविणे या गोष्टींचा समावेश आहे. या सर्व कामांसाठी एक ते दोन वर्षांचा कालावधी लागणार असून या उपाययोजनांमुळे लोकलच्या वेगामध्ये वाढ होऊन तांत्रिक बिघांडावर मात करण्यात येईल, असा विश्‍वास पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
पश्‍चिम रेल्वे मार्गावरील उपनगरीय लोकल सेवा थेट डहाणूपर्यंत गेली आहे. सतत वाढणार्‍या लोकलच्या फे र्‍यांमुळे वाहतुकीचा भार वाढला आहे. दररोज परेवर १३0५ लोकलच्या फेर्‍या होतात. त्यामुळे निर्माण होणार्‍या तांत्रिक बिघाडांवर उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. या उपाययोजनांमध्ये बोरिवलीतील चौपदरीकरणाकडील क्रॉसओव्हरची जागा दहिसरकडे सरकवण्यात येणार आहे. तसेच सध्या असलेल्या फाटकाजवळील क्रॉसओव्हरमध्ये विरुद्ध दिशेने ये-जा करणार्‍या गाड्या सिग्नलवर थांबविल्या जातात, त्यात लांब पल्ल्याच्या आणि लोकलचाही समावेश आहे. ऐन पिक अवरच्या वेळेस गाड्या थांबविण्यात आल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत होते. हेच लक्षात घेऊन परेने क्रॉसओव्हरची जागा दहिसरकडे सरकविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे सात कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या कामात सिग्नल, ओव्हरहेड, रेल्वे ट्रॅक यांचा समावेश असणार आहे.

हार्बर मार्गावर माहिम-अंधेरी मार्गावर सर्व लोकल ९ वरून १२ डब्यांच्या धावणार आहेत. त्यामुळे सुमारे ३३ टक्क्यांनी प्रवासी क्षमता वाढणार आहे. त्याचबरोबर दादरमधील चार क्रमांकाचा प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात येणार आहे. सर्व लोकल साधारणपणे १५ सेकंदाचा थांबा घेतात, परंतु या प्लॅटफॉर्मवर लोकल ४५ सेकंदाचा थांबा घेतात, त्यामुळे लोकलचे वेळापत्रक बिघडते. त्यामुळे या प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात येणार आहे. तसेच अंधेरी यार्ड रिमॉडेलिंगचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच जोगेश्‍वरी-अंधेरी-विलेपार्ले पट्टय़ातील क्रॉसओव्हरमुळे गाड्यांचा वेग मंदावतो. त्यावर मात करण्यासाठीही तांत्रिक क ामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी किमान ३0 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या सर्व कामांसाठी पुढील २ वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages