'गुरु नानक'चे प्राचार्य अटकेत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'गुरु नानक'चे प्राचार्य अटकेत

Share This
शाळा-कॉलेजांमधील प्रवेशांसाठी पालकांची पिळवणूक होत असल्याची अनेक प्रकरणे उजेडात येत असतानाच मुंबईतील अग्रणी संस्थांपैकी एक असलेल्या गुरु नानक खालसा कॉलेजच्या प्राचार्यांना प्रवेशासाठी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. गुरु नानक कॉलेजचे प्राचार्य अजित सिंग आणि त्यांच्या खासगी सचिव निकिता वैद्य यांना पोलिसांनी २५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. विज्ञान शाखेच्या बारावी इयत्तेत प्रवेश देण्यासाठी सिंग यांच्याकडून संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सिंग यांना सापळा रचून पकडण्यात आले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages