मुंबई : १0 वर्षांखालील अजाण बालकांना त्यांच्या नावाने स्वतंत्रपणे बँक खाते सांभाळण्याबरोबरच त्यात व्यवहार करण्याची तसेच एटीएम आणि धनादेश पुस्तिकाही मिळवता येईल, असे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेने दिल्याने अनाथ, असहाय्य मुलांनाही आर्थिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा आशेचा किरण सापडला आहे.
अनाथ, असहाय्य असणारी अनेक मुले छोट्या-मोठय़ा कामांवर जुंपण्यात आलेली आहेत. त्यांच्या कमाईचे, बचतीचे कोणतेही साधन नसल्याने ही मुले नशा करतात तसेच वाईट सवयींचीही शिकार होतात. बिगर सरकारी संघटना 'चेतना'च्या बॅनरखाली काम करणार्या मुलांनी रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. स्टेशनवर राहणार्या १२ वर्षीय राघव (नाव बदललेले) याने सांगितले की, तो दररोज १५0 रुपये कमवतो, मात्र आता बँकेमध्ये खाते खोलून आपल्या भविष्यासाठी काहीतरी बचत करू शकेन. कचरा वेचणार्या १४ वर्षीय राहुल (नाव बदललेले) याचे म्हणणे आहे की, आम्ही मुले रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे खूश आहोत. आम्हा मुलांसाठी मोबाईल बँकिंगची सुविधा सुद्धा सुरू करण्यात यावी, अशी आमची इच्छा आहे.
'चेतना'चे संचालक संजय गुप्ता म्हणाले की, मुलांचे बँकांमध्ये खाते नसल्यामुळे त्यांनी कमावलेले पैसे नशा, जुगार आणि पोर्नोग्राफीसारख्या बाबींवर खर्च होत असतात. आता बँकांमध्ये खाते खोलण्यामुळे या मुलांना पैशांची बचत करण्याची सवय लागेल. पुढे जाऊन त्याचा त्यांना बराच फायदा होईल.
रिझर्व्ह बँकेने आपल्या निर्देशामध्ये म्हटले आहे की, १0 वर्षांहून अधिक वयाच्या मुलांचे बचत खाते सहखातेदाराशिवाय खोलले जाऊ शकते आणि संबंधित मुलांना स्वत: या खात्यांचे व्यवहार करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.