मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com)
शिवसेना-भा.ज.पा., आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष अशी महाराष्ट्रात महायुती घडवून आणणारे महायुतीचे शिल्पकार व महाराष्ट्राच्या समाजमनाची जाण असणारा लोकनेता केंद्रिय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या दुःखद निधनाने महाराष्ट्राचीच नव्हे,तर देशाची कधीही भरुन न येणारी हानी झालेली आहे, अशी श्रद्धांजली मुंबईचे महापौर सुनिल प्रभु यांनी वाहिली आहे. मुंडे यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून सर्व मुंबईकरांच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करीत असल्याचेही महापौर प्रभु यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

