बेस्ट "लाईफलाईन" कि "डेथलाईन" ? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट "लाईफलाईन" कि "डेथलाईन" ?

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com/ अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेचा उपक्रम असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या बस खाली चिरडून बसचा धक्का लागून झालेल्या अपघातामध्ये सन २००६ ते २०१३ या काळात ३१० लोकांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीमध्ये २५६ गंभीर स्वरूपाचे तर ४००९ मध्यम स्वरूपाचे अपघात झाले आहेत. आहे. यामुळे ज्या बसला मुंबईची दुसरी "लाईफलाईन" बोलली जाते ती बस लोकांची "डेथलाईन" बनत चालली आहे कि काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सन २००६ - २००७ ते २०१२ - १३ पर्यंत २८८ लोकांचा मृत्यू झाला असून १६५ गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत तर ३६७७ मध्यम स्वरूपाचे अपघात झाले आहेत. सन २०१३ मध्ये एप्रिल ते डिसेंबर या कालावधीमध्ये २२ लोकांचा मृत्यू झाला असून ९१ गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत तर ३३२ मध्यम स्वरूपाचे अपघात झाले आहेत. 

बसच्या झालेल्या अपघाताबाबत सन २००७-८ मध्ये ३४९ प्रकरणात ३१. ७४ लाख रुपये, सन २००८-९ मध्ये २१७ प्रकरणात ३६. लाख रुपये, सन २००९-१० मध्ये २६१ प्रकरणात ५०. १० लाख रुपये, सन २०१०-११ मध्ये २१७ प्रकरणात ३०. ०२ लाख रुपये, सन २०११-१२ मध्ये ३२९ प्रकरणात ७०. ०६ लाख रुपये, सन २०१२-१३ मध्ये २५१ प्रकरणात ४४.९६ लाख रुपये असे एकूण १६२४ प्रकरणात २६३.२७ लाख रुपयांचा मोबदला लोकांना देण्यात आल्याचे समजते. 

बेस्टचे सन एप्रिल २०१२ मध्ये १३९८ दावे प्रलंबित होते या प्रलंबित खटल्यामध्ये ४३१.५८ लाख रुपये बेस्टने मृत व अपघातग्रस्त लोकांना देणे बाकी आहे. सन २०१२ - १३ मध्ये १७९ दावे प्रलंबित असून त्याबदल्यात अपघातग्रस्तांना २३६.११ लाख रुपये बेस्टने देणे बाकी आहे. १६६ प्रकरणात अपघातग्रस्तानी ७५०.७३ लाख रुपयांचा दावा दाखल केला होता त्यापैकी ४३६.४५ लाख बेस्टने सबंतीत लोकांना प्रदान केले आहेत. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages