मुंबई - मुंबईतील रिक्षा व टॅक्सीचे किमान भाडे दोन रुपयांनी वाढवण्याचा प्रस्ताव आज (शुक्रवारी) राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रस्तावाला उच्च न्यायालयाकडून संमती मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रस्ताव उच्च न्यायालयासमोर मांडण्यात येईल. न्यायालयाने संमती दिल्यास भाडेवाढ होईल. सध्या रिक्षाचे किमान भाडे 15 रुपये असून, पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी भाडे 9.87 रुपये आहे. टॅक्सीचे किमान भाडे 19 रुपये असून, पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 12.35 रुपये आहे. दरवाढीच्या मागणीसाठी मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनने 21 जूनपासून संपाचा इशारा दिला होता; मात्र सरकारने दरवाढीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हा प्रस्तावित संप मागे घेण्यात आला आहे.